पंतप्रधान मोदी यांनी मराठीमधून दिल्या श्री गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा !

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘आपणा सर्वांना गणेशचतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया !’

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाभोवतीच्या १० चौरस कि.मी.चे परिघ ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित !

मांस आणि मद्य यांच्या व्रिकीवर बंदी

(म्हणे) ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’च्या आयोजकांना ठार करण्याची हिंदुत्वनिष्ठांकडून धमकी !’ – ब्रिटिश दैनिक ‘गार्डियन’चा बिनबुडाचा आरोप

भारतातील हिंदूंच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढे मोठे षड्यंत्र रचले जात असतांना केंद्र सरकारने त्याची नोंद घेऊन कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘मंत्रीपद नाही, तर केवळ मुलांना जन्म देणे हेच महिलांचे काम !’ – तालिबान

भारतातील महिलांच्या संघटना, मानवाधिकार संघटना आदी तालिबानच्या विरोधात तोंड का उघडत नाहीत कि तालिबान करत आहे ते योग्यच आहे, असे त्यांना वाटते ?

लुधियाना (पंजाब) येथील एका बेकरी व्यावसायिकाने ‘इको फ्रेंडली’ म्हणून बनवली चॉकलेटची श्री गणेशमूर्ती !

गेल्या काही वर्षांपासून ‘इको फ्रेंडली’ सण साजरा करण्याचा प्रघात केवळ हिंदु धर्मासाठीच जाणीवपूर्वक पाडला जात आहे. दुसरीकडे मात्र मोहरम, बकरी ईद आदी सण त्या धर्माच्या परंपरेनुसार पर्यावरणाला लाथाडून साजरे केले जात आहेत.

तालिबानला साहाय्य करणार्‍या पाकला त्याचे परिणाम लवकरच भोगावे लागतील ! – इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद

अफगाणिस्तानच्या पंजशीर येथील युद्धामध्ये तालिबानला पाकने उघडपणे साहाय्य केले. पाकचे सैन्याधिकारी यात सहभागी होते. पंजशीरमध्ये जे काही झाले, त्याचा परिणाम पाकला भोगावा लागणार आहे, अशी चेतावणी इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी दिली आहे.

केरळमधील ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांच्या जाळ्यात अडकत आहेत !

हिंदूंचे धर्मगुरु आणि नेते या जिहादविषयी बोलत असतांना त्यांना धर्मद्वेषी म्हणून टीका करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता गप्प का आहेत ?

कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींच्या संदर्भातील ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या बंदीच्या आदेशाचे ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून उल्लंघन !

कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीं प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवाद, पश्‍चिम विभाग, पुणे यांनी ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी दिला होता.

अफगाणिस्तानशी व्यापार करतांना पाकिस्तानी चलनाचा वापर करणार ! – पाकिस्तान

याचाच अर्थ अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न पाक करणार, असाच होतो ! पाकचा हा डाव जागतिक समुदाय कधी ओळखणार ?

एक लाख रुपयांची लाच घेणारा साहाय्यक निरीक्षक पोलिसांच्या कह्यात !

फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.