रस्त्यावरील घायाळ गुरे अथवा मोकाट गुरे यांना गोशाळेत वाहून नेण्यासाठी अनुक्रमे ५ सहस्र आणि २ सहस्र रुपयांची तरतूद

अध्यक्ष कमलाकांत तारी म्हणाले, ‘‘रस्त्यावर मोकाट फिरत असलेला गोवंश घायाळ अवस्थेत दिसला, तर आवश्यक साहाय्यासाठी नागरिकांनी ८३९०८९८५५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

काश्मीरमध्ये दोन चकमकीत ४ आतंकवादी ठार

३-४ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, तर त्यासाठी त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे आवश्यक !

तरणतारण (पंजाब) येथे तिघा खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

या आतंकवाद्यांना आता आजन्म पोसण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

वायू प्रदूषणाविषयी जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केली नवीन गुणवत्ता पातळी !

१००-१५० वर्षांपूर्वी जगात प्रदूषण नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती; मात्र विज्ञानामुळे आज पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीव नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी कधी मान्य करणार ?

सर्वोच्च न्यायालय ‘पेगासस’ हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ञांची समिती स्थापन करणार !

याविषयीचा आदेश पुढील आठवड्यापर्यंत येऊ शकतो. तांत्रिक तज्ञांच्या समितीतील नावे लवकरच अंतिम केली जातील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे साधू मणिराम दास यांचा मंदिराच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडून मृत्यू

येथील मणिराम दास या साधूंचा श्री राम मंत्रार्थ मंडपम् मंदिराच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडून संशयास्पदरित्या मृत्यू झाला. पोलीस या मृत्यूचे अन्वेषण करत आहेत. ही हत्या आहे, आत्महत्या आहे कि अघपात आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.

कपाळावर टिळा लावून येणार्‍या हिंदु विद्यार्थ्याला धर्मांध शिक्षिकेकडून अन्य लोकांकरवी अमानुष मारहाण !

जमावाकडून होणार्‍या मारहाणीवरून हिंदूंना असहिष्णु ठरवून पुरस्कार परत करणारे साहित्यिक, अभिनेते आदी या घटनेविषयी गप्प का ?

काश्मिरी नेते सुशील पंडित यांच्यावरील गुन्हा रहित !

देहलीमध्ये २१ मे २०१८ या दिवशी एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एका नेत्याने काश्मीरच्या बारामुला येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात ५ सैनिक हुतात्मा झाल्याचे सांगितल्यावर काश्मिरी नेते सुशील पंडित यांनी ट्वीट केले होते.

रायपूर (छत्तीसगड) महानगरपालिकेने श्री गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेल्याचा आणि विसर्जनस्थळी त्या फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघड !

आतापर्यंत अनेक ठिकाणी श्री गणेशाचा अशा प्रकारे अवमान होऊनही एकालाही कठोर शिक्षा झालेली नाही, हे लक्षात घ्या ! यासाठी हिंदूंनी संघटित होऊन संबंधितांना कायदेशीर शिक्षा होण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा !

फोंडाघाट येथे पोलीस आणि ग्रामस्थ यांनी हत्येसाठी होणारी ६ गोवंशियांची वाहतूक रोखली !

२० सप्टेंबरला रात्री ९ वाजता खारेपाटण येथून मुरगुडला (जिल्हा कोल्हापूर) जाणारा टेम्पो पोलीस आणि ग्रामस्थ यांनी अडवून तपासला असता, त्यात ६ बैल कोंबून ठेवल्याचे निदर्शनास आले. या वेळी टेम्पोचा चालक प्रवीण बाळासो घोटणे याने हे गोवंशीय हत्येसाठी मुरगुड नेत असल्याचे मान्य केले.