अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने तेथील राज्ये ऑक्टोबर ‘हिंदु वारसा मास’ म्हणून साजरा करणार !

जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावलेल्या निधर्मी, पुरो(अधो)गामी, साम्यवादी चमूला चपराक !

उदय माहूरकर लिखित ‘वीर सावरकर – द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार प्रकाशन !

केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त असून ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक आहेत पुस्तकाचे लेखक उदय माहूरकर !

मनसा (मध्यप्रदेश) येथे महिला पोलीस शिपायावर सामूहिक बलात्कार

बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कायदे अपुरे ठरत आहेत; कारण आरोपींना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नाही, हे लक्षात घ्या ! जोपर्यंत फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !

छतरपूर (मध्यप्रदेश) येथील मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर ‘सेकंड हँड जवानी’ गाण्यावर नृत्य करणार्‍या तरुणीचा बजरंग दलाकडून विरोध

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारचे अयोग्य कृत्य करतात आणि मंदिरांचे पावित्र्य अन् महत्त्व न्यून करतात, हे लक्षात घ्या !

पाकने पाकव्याप्त काश्मीर रिकामी करावे !

केवळ संयुक्त राष्ट्रेच नव्हे, तर जागतिक समुदायालाही पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची स्थिती ठाऊक आहे; मात्र कुणीही त्यांचे साहाय्य करायला पुढे येत नाही, हे लक्षात घ्या !

आज शेतकरी संघटनांचा ‘भारत बंद !’

‘बंद’ पाळणे म्हणजे देशाची अब्जावधी रुपयांची हानी करणे होय ! ‘बंद’चे आवाहन करणार्‍या अशा संघटना आणि त्यांना समर्थन देणारे राजकीय पक्ष यांच्यावर देशाची हानी केल्यासाठी बंदीच घातली पाहिजे !

उत्तराखंडमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढत चालली आहे लोकसंख्या

धर्मांधांचे हे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र असून त्या माध्यमातून निकटच्या भविष्यात त्यांचा हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर आक्रमण करण्याचा कट असू शकतो, ही शक्यता नाकारता येणार नाही ! असे होऊ नये, यासाठी हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

युरोपमधील लिथुआनिया देशात चिनी भ्रमणभाष संच न वापरण्याची नागरिकांना सूचना

भारत सरकारनेही अशी सूचना नागरिकांना दिली पाहिजे !

(म्हणे) ‘प्रभु श्रीराम हे केवळ भाजप आणि संघ यांचेच नाहीत, तर संपूर्ण जगाचे आहेत !’ – फारूक अब्दुल्ला, नेते, नॅशनल कॉन्फरन्स

जर असे आहे, तर भारतातील मुसलमानांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्याला विरोध का केला ? भगवान श्रीरामाप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव हेही सार्‍या जगाचे आहेत, तर त्यांच्या काशी आणि मथुरा येथील मंदिरांची जागा मुसलमान हिंदूंना का सोपवत नाहीत ?