हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धाराशीव जिल्ह्यात विविध ठिकाणी, तसेच बारामती येथे प्रशासनाला निवेदन सादर
धाराशीव, १० सप्टेंबर (वार्ता.) – वर्षाचे ३५५ दिवस सांडपाणी आणि घनकचरा यांद्वारे होणार्या भीषण प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘मूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवल्या जातात. याद्वारे होणारी गणेशमूर्तीची विटंबना तातडीने रोखण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्ह्यात विविध ठिकाणी, तसेच बारामती येथे देण्यात आले.
धाराशिव येथील नगरपालिका मुख्याधिकारी हरिकल्याण एलगुट्टे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी एलगुट्टे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष पिंपळे, भगवान श्रीनामे, अमोल काकडे आदी उपस्थित होते.
१. तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील पालिका कार्यकारी अधिकारी कार्यालय, तसेच नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक पंडित जगदाळे, सुनील रोचकरी, राहुल खपले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अमित कदम, दीपक पलंगे, विनोद रसाळ आदी उपस्थित होते.
२. बारामती येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईगडे आणि नगरसेवक श्री. सुनील सस्ते यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश जाधव, सौ. प्राजक्ता सांगळूदकर आणि सौ. संगीता बोरूडे आदी उपस्थित होते.