संस्कृतची वैज्ञानिकता आणि समृद्धता यांकडे संपूर्ण जग आकर्षित होत आहे ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संस्कृत सप्ताहानिमित्त विशेष ‘ट्विटर लाईव्ह’ कार्यक्रमाचे आयोजन

अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सर्व सैनिक माघारी फिरले !

अमेरिकेने दिलेला शब्द पाळत ३१ ऑगस्टला अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडले. त्यामुळे आता अफगाणिस्तान पूर्णपणे (पंजशीर प्रांत वगळता) तालिबानच्या कह्यात गेला आहे.

चीनने १८ वर्षांखालील मुलांच्या ऑनलाईन खेळण्यावर लावले वेळेचे निर्बंध !

चीन जे करते, ते भारत का करत नाही ? चीनप्रमाणे भारतानेही असाच निर्णय घेणे आवश्यक !

मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर सरकारकडून बंदी

देशातील प्रत्येक तीर्थस्थानी अशा प्रकारची बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा, असेच हिंदूंना वाटते ! हे उत्तरप्रदेश सरकारला शक्य आहे, तर केंद्र सरकार, तसेच अन्य भाजप शासित राज्ये यांनाही ते सहज शक्य असणार, यात शंका नाही !

श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने श्रीनगरमध्ये काढण्यात आली मिरवणूक !

कलम ३७० हटवल्यानंतर हिंदूंनी प्रथमच श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणात लाल चौकात मिरवणूक काढली. या वेळी सुरक्षादलांकडून संरक्षण देण्यात आले होते.

अवैध फेरीवाल्यांचे ठाणे महानगरपालिकेच्या महिला साहाय्यक आयुक्तांवर आक्रमण !

अवैध फेरीवाल्यांना कायदा आणि सुव्यवस्था, तसेच पोलीस, प्रशासन यांचा धाकच राहिलेला नाही, हेच यावरून लक्षात येते !

सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधिशांनी घेतली एकाच वेळी शपथ !

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी एकाच वेळी ९ न्यायाधिशांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश म्हणून शपथ दिली. प्रथमच इतका मोठा शपथविधी सोहळा पार पडला. या ९ न्यायाधिशांमध्ये ३ महिला न्यायाधिशांचा समावेश आहे.

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण जयंती साजरी करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांकडून आक्रमण !

पाकचे पंतप्रधान पाकमधील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्याच्या मोठमोठ्या बाता मारतात, तसेच भारतातील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या कथित अत्याचारांवरून उर बडवत असतात. त्यांना अशा घटना का रोखता येत नाहीत ? हे त्यांनी सांगायला हवे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘जगातील सर्वश्रेष्ठ हिंदु धर्मात जन्म मिळूनही धर्मासाठी काहीच न करणारे हिंदू मरणाच्याच लायकीचे आहेत किंवा जगण्याच्या लायकीचे नाहीत’, असे काही जणांना वाटते; पण ते योग्य नाही. ‘त्यांना साधना शिकवणे’, हे हिंदूंचे कर्तव्य आहे.

भगवान श्रीकृष्णाच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

भगवान श्रीकृष्णाच्या रथाचे नाव ‘गरुडध्वज’ होते आणि त्याच्या सारथ्याचे नाव ‘दारूक/बाहुक’ होते…