‘ऑनलाईन मोडी लिपी’ कार्यशाळेचे आयोजन !

प्राचीन लिपी मोडी प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांच्या वतीने ३ ऑक्टोबर २०२१ या दिवशी रात्री ७ ते ८.३० या वेळेत ऑनलाईन मोडी लिपी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आगाऊ नाव नोंदणी आवश्यक आहे.

बालगंधर्व नाट्यगृह सुधारणाकामात सांगली महापालिका आयुक्त आणि संबंधित नगरसेवक यांच्या पाठपुराव्यामुळे गती ! – श्रेयस गाडगीळ

बालगंधर्व नाट्यगृहात सुधारणा होण्यासाठी विविध रंगकर्मींनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त यांचा पाठपुरावा केला होता.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन !

महाविकास आघाडी सरकार महिला अत्याचाराविरुद्ध कुठलीही भक्कम कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले.

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीस साहाय्य करण्याचा यळगुड (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषिपूरक सेवा संस्थेचा ठराव !

विशाळगडाचे जतन व्हावे यासाठी कृती समितीस सर्वाेतोपरी साहाय्य करण्याचा ठराव संस्थेने केला आहे.

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने ‘चेतना संस्था’ येथील गतिमंद मुलांच्या शाळेला स्वच्छता साहित्य भेट !

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘चेतना संस्था’ येथील गतिमंद मुलांच्या शाळेला २३ सप्टेंबरला स्वच्छता साहित्य भेट देण्यात आले.

नवीन मतदार नाव नोंदणी अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा ! – कुबेरसिंह राजपूत, शिवसेना

१८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांचे नाव मतदारसुचीत येण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नवीन मतदार नाव नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान ३० सप्टेंबरअखेर चालू असणार आहे.

पुण्यात ‘ई-चलना’द्वारे वाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड भरण्यास नागरिकांची न्यायालयात गर्दी !

ई-चलन भरण्यासाठी नागरिकांनी न्यायालयात सकाळपासून गर्दी केली होती; परंतु दंडाचे प्रकरण निकालात काढण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

मलबार (केरळ) येथे वर्ष १९२१ मध्ये धर्मांधांकडून नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार ! – योगी आदित्यनाथ

केरळच्या मलबारमध्ये वर्ष १९२१ मध्ये मोपला हत्याकांडाद्वारे नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. जिहाद्यांनी १० सहस्रांहून अधिक हिंदूंची हत्या केली, अनेक मंदिरे पाडण्यात आली, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील मशिदीमध्ये कुराण शिकण्यासाठी गेलेल्या १२ वर्षांच्या मुलाचे मौलवीकडून लैंगिक शोषण !

चर्च आणि मशिदी यांमध्ये मुलांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना समोर येत असतांना याविषयी प्रसारमाध्यमे कधी चर्चासत्रे आयोजित करत नाहीत कि पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !