याचाच अर्थ अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न पाक करणार, असाच होतो ! पाकचा हा डाव जागतिक समुदाय कधी ओळखणार ? – संपादक
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानकडे अमेरिकी डॉलर्सची कमतरता आहे. त्यामुळे अफगाणिस्तानसमवेत व्यापार करतांना पाकिस्तानी चलनाचाच वापर केला जाईल, अशी माहिती पाकचे केंद्रीय अर्थमंत्री शौकत तारिन यांनी घोषित केले आहे.
Pakistan will use own currency for bilateral trade with Taliban govt in Afghanistan: Sourceshttps://t.co/HQwYL2mk7N
— Zee News English (@ZeeNewsEnglish) September 10, 2021
शौकत तारिन यांनी म्हटले की, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर सातत्याने आम्ही लक्ष ठेवून आहोत. अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी पाकिस्तान शक्य ते सर्व साहाय्य करणार आहे. याच दृष्टीकोनातून एक पथक अफगाणिस्तानला पाठवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.