गोमूत्राच्या साहाय्याने जलप्रदूषणावर परिणामकारक उपाय !

कोल्हापूरच्या युवा वैज्ञानिकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन जागतिक ख्यातीप्राप्त ‘नेचर’ नियतकालिकात प्रसिद्ध !

पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताला प्रथमच १९ पदके !

काही आठवड्यांपूर्वी येथेच झालेल्या ऑलिंपिकमध्येही भारताने प्रथमच सर्वाधिक ७ पदके मिळवली होती.

फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांचा मृतदेह पाकिस्तानी राष्ट्रध्वजात गुंडाळल्यावरून गुन्हे नोंद !

केवळ गुन्हे नोंदवून थांबू नये, तर अशांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

पाकिस्ताननेच तालिबानला पोसले ! – भारताचा आरोप

असे आरोप करून तालिबान आणि पाक यांच्यावर काहीच परिणाम होत नाही अन् होणारही नाही ! त्यापेक्षा पाकला नष्ट करण्यासाठी भारताने काही प्रयत्न केले, तर ते योग्य ठरेल !

पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये आत्मघातकी आक्रमणात ३ जण ठार, तर २० जण घायाळ

या आक्रमणाचे दायित्व ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने घेतले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात सर्वांत लोकप्रिय नेते !

अमेरिका, युनायटेड किंगडम, रशिया आदी १३ प्रमुख देशांच्या नेत्यांना टाकले मागे !

तालिबानला भारतातील मुसलमानांची चिंता करण्याची आवश्यकता नाही ! – भारताचे तालिबानला प्रत्युत्तर

‘मुसलमान म्हणून तालिबानला भारतातील काश्मीरमधील किंवा अन्य कोणत्याही देशातील मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार आहे’, असे वक्तव्य तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने केले होते.

‘इन्फोसिस’कडून नक्षलवादी आणि साम्यवादी यांना साहाय्य ! – ‘पांचजन्य’ नियतकालिकातून आरोप

‘इन्फोसिस’सारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रथितयश आस्थापनावरील हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. केंद्रशासनाने या आरोपांची शहानिशा करणे आवश्यक आहे !

केरळमध्ये निपाह विषाणूमुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

केंद्र सरकारकडूनही याला दुजोरा देण्यात आला असून केंद्राचेही आरोग्य पथक केरळला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आता तरी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे डोळे उघडतील का ?

‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती हानीकारक आहेत’, हे विज्ञानाने सिद्ध केल्याने हिंदु धर्मात सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी विज्ञानाला धरून असते, हे सिद्ध झाले आहे. आता तरी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे डोळे उघडतील का ?’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले