सोलापूर येथील बोगस आधुनिक वैद्याचे पोलिसांना चकवा देत पलायन !

येथील रविवार पेठ येथील ‘जय हॉस्पिटल’मध्ये काम करणार्‍या बाळासाहेब नंदुरे या तोतया आधुनिक वैद्याला पोलीस शोधत आहेत. मागील ६ मासांपासून नंदुरे याने वैद्यकीय पदवी नसतांनाही रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले.

राज्यातील लसीकरण मोहिमेमध्ये सातारा जिल्हा पुढे !

राज्यभरात लसीकरण मोहिमेमध्ये सातारा जिल्हा अग्रेसर ठरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोविशिल्डचे १ लाख ७० सहस्र, तर कोव्हॅक्सिनचे १२ सहस्र ४८० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे लसीकरण सत्रांची संख्याही ३५० हून अधिक करण्यात आली आहे.

श्री गजानन महाराज संस्थानच्या ‘आनंदसागर’ या प्रेक्षणीय स्थळाच्या विरुद्धची याचिका उच्च न्यायालयातून निकाली !

शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या ६५० एकर जागेत वसलेल्या ‘आनंदसागर’ या प्रेक्षणीय स्थळाच्या विरोधात प्रविष्ट केलेली याचिका येथील खंडपिठाने निकाली काढून याचिकाकर्ता अशोक गारमोडे यांना १० सहस्र रुपयांचा दंड दिला आहे.

मुंबई येथे ५० लाख रुपयांच्या खंडणीचे पत्र देऊन पसार झालेल्या बुरख्यातील नक्षलवादी महिलेसह दोघांना अटक !

येथील गोरेगाव पूर्व वनराई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात रहाणारे आधुनिक वैद्य डॉ. शाह (वय ७५ वर्षे) यांना पत्र पाठवून ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका बुरख्यातील नक्षलवादी महिलेला अटक केली आहे.

सनातनचे सर्व ग्रंथ उत्तम असून राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ठेवणे आवश्यक ! – महर्षि डॉ. आनंद गुरुजी, अध्यक्ष, कर्नाटक राज्य धार्मिक परिषद

३ सप्टेंबर या दिवशी सनातनच्या साधकांनी ‘सनातन ज्ञानशक्ती प्रसार मोहिमे’साठी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्या वेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.

केरळच्या कन्नूर विश्‍वविद्यालयामध्ये पू. गोळवलकरगुरुजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकांतील भाग शिकवला जाणार नाही !

माकप सरकारचा हिंदुद्वेष ! केवळ द्वेष भावनेतून राष्ट्रपुरुषांच्या विचारांना नाकारणारे कधीतरी सर्वसमावेशक होऊ शकतात का ?

चरणजीतसिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यागपत्र दिल्यामुळे काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असणार आहेत.

नवरात्रौत्सवामध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची उंची ४ फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या शासनाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास ओडिशा उच्च न्यायालयाचा नकार !

श्री दुर्गादेवीची ८ फुटांपर्यंतची मूर्ती बनवण्याची मागणी करणारी याचिका बालू बाजार पूजा कमिटीकडून न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.

अयोध्येतील श्रीराममंदिराचा पाया सिद्ध !

मंदिराचा दुसरा टप्पा २ मासांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिली.

बेंगळुरू येथे मुसलमान महिला बँक अधिकार्‍याला मारहाण करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

हिंदूंना तालिबानी आणि असहिष्णु म्हणणारे अशा घटनांविषयी मौन का बाळगतात ?