जनतेचे रक्षकच बनले भक्षक !
पुणे – फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करून त्यांपैकी १ लाख रुपये स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांच्यासह संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले. तक्रारदारांच्या वडिलांवर विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यामध्ये जामीन मिळण्यास साहाय्य होण्यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. यामध्ये तक्रारदाराने तडजोडीअंती ३ लाख रुपये देण्याची सिद्धता दर्शवली. त्यातील एक लाख रुपये स्वीकारतांना संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले, तर न्यायालयातूनच साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनाही कह्यात घेतले. या दोघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.