गेली ११ वर्षे शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती सिद्ध करून घेऊन त्या वितरित करणारे मिरज येथील नितीन कुलकर्णी !

या मूर्ती शाडू मातीच्या असून त्या नैसर्गिक रंगात रंगवलेल्या आहेत. गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाची पार्श्‍वभूमी असूनही श्री. कुलकर्णी यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

ठाणे शहर पोलिसांनी श्री गणेशाची पोलिसाच्या वेशातील प्रतिकृती हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर हटवली !

हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नसल्याने देवतेचे मानवीकरण केल्याने पाप लागते, देवतेचा अवमान होतो, हे त्यांना लक्षात येत नाही ! त्यामुळे पोलीस प्रशासनासह सर्वत्र श्री गणेशाच्या चित्राचा वापर विविध कारणांसाठी केला जातो !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

देहली येथील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात घोटाळा झाल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली.

सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे निरंजन आवटी विजयी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे निरंजन आवटी यांचा विजय झाला आहे. निरंजन आवटी यांनी काँग्रेसचे फिरोज पठाण यांचा २ मतांनी पराभव केला.

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाच्या विरोधात ठाणे जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये संताप !

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाला भारत सरकारने विरोध करावा’, या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर आणि भिवंडी येथील नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

विवाहित असतांना ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये रहाणे अवैध नाही !

समाजव्यवस्था उत्तम आणि सुरळीत रहावी, यासाठी हिंदु धर्माने विवाह संस्थेचे काही नियम ठरवून दिले आहेत. विवाहबाह्य संबंधांना अनैतिक ठरवले होते. त्यामुळेच हा समाज लक्षावधी वर्षांपासून टिकून राहिला आहे, हे लक्षात घ्या !

कोरोना महामारीच्या काळात करावयाच्या घरगुती गणेशोत्सवाविषयी शंकानिरसन !

गणेशोत्सवाविषयी शंकानिरसन व श्री गणेशाच्या उपासनेच्या अंतर्गत करावयाच्या कृती.

श्री गणेशचतुर्थीचा सण आनंदाचा । जाणूनी धर्मशास्त्र कृपाशीर्वाद मिळवू श्री गणेशाचा ॥

आम्ही प्रतिदिनच श्री गणेशाच्या छायाचित्राचेे पूजन करत असतांनासुद्धा श्री गणेशचतुर्थीला मात्र गणपतीची वेगळी मूर्ती का आणायची ?

विद्याधिपतीला साकडे !

येणार्‍या काळात होणार्‍या महाभयंकर तिसर्‍या महायुद्धापूर्वी वैचारिक शीतयुद्धाने जग ढवळून निघाले आहे. ‘हे वैचारिक युद्ध या मुख्य युद्धाचा गाभा कसे ठरणार आहे ?’, ते अल्पांशाने तरी समजून घेतले पाहिजे.

श्री गणेशचतुर्थी विशेष : श्री गणेशपूजनातून पुष्कळ चैतन्य निर्माण होऊन पूजक आणि पुरोहितांना झाला आध्यात्मिक स्तरावर लाभ !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी