श्री गणेशचतुर्थीसाठी राज्यशासन नवीन नियमावली प्रसिद्ध करणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायद्यानुसार कारभार चालणार ! – तालिबानची घोषणा

लोकशाहीवर ‘प्रेम’ करणार्‍या भारतातील तालिबानीप्रेमींना अफगाणिस्तानमधील शरीयतनुसार चालणारा कारभार मात्र आवडेल आणि ते त्याचे समर्थनच करतील !

संगीत, नृत्य, लोकशाही, महिला अधिकार आदींचा विरोध करणारा इस्लाम धर्म ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन

भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, इस्लामप्रेमी, अभ्यासक आदी याविषयी बोलतील का ? तालिबानचा विरोध करतील का ?

चीन आणि तालिबान यांचे संंबंध फारसे चांगले नसल्याने ते काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत ! – जो बायडेन

‘तालिबान आणि चीन यांची वाढती जवळीक, तसेच चीनकडून तालिबानला आर्थिक साहाय्य दिले जाईल, हा चिंतेचा विषय आहे का ?’ या प्रश्‍नावर उत्तर देतांना बायडेन यांनी हे मत व्यक्त केले.

मोठे विक्रेते स्वतःजवळ अमली पदार्थ बाळगत नसले, तरी त्यांच्यावर होणारी कारवाई योग्यच ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

अमली पदार्थ विक्रेत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

(म्हणे) ‘मला अपेक्षा आहे की, तालिबान इस्लामी नियमांच्या आधारावर चांगले शासन करील !’ – फारूक अब्दुल्ला

यातून फारूक अब्दुल्ला यांच्यासारख्यांची खरी मानसिकता स्पष्ट होते ! प्रत्येक धर्मांधाला त्याच्या धर्मानुसार म्हणजे शरीयतनुसारच जगात राज्य व्यवस्था हवी आहे; जेथे ती शक्य नाही, तेथे ते तसे करण्याच्या प्रयत्नात असतात, हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?

देशात आणि देशाबाहेर हिंसा हीच पाकची संस्कृती आहे ! – भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले

पाक एक कोडगा देश असल्याने त्याला शब्दांचे कितीही फटके दिले, तरी त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही ! त्याला कायमचे नष्ट करणेच योग्य !

बंगालमध्ये भाजपच्या खासदाराच्या निवासस्थानावर फेकले बाँब !

ज्या राज्यात खासदार असणारी व्यक्ती सुरक्षित नाही, तेथे सर्वसामान्य व्यक्तीच्या सुरक्षेची स्थिती कशी असेल, याची कल्पना करता येत नाही !

(म्हणे) ‘भारतात मुसलमान कधीच बहुसंख्यांक बनू शकत नाहीत !’ – काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह

देशातील अनेक जिल्हे आणि तालुके आता मुसलमानबहुल झाले आहेत. तेथील हिंदूंना धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जातो, त्यांना तेथून पलायन करण्यास बाध्य केले जाते, याविषयी दिग्विजय सिंह बोलतील का ?

प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत ! – मध्यप्रदेशातील मंत्री उषा ठाकुर यांचे आवाहन

समाजात खून, बलात्कार आदींचे प्रमाण वाढत असतांना ते रोखण्यास सरकारी यंत्रणा हबल झाल्या आहेत. हे लक्षात घेऊन आता समाजानेच स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होणे आवश्यक आहे !