फोंडा तालुक्यातील निरंकाल भागातील माकडमारे जमातीतील लोकांच्या घरांमध्ये गोवा मुक्तीनंतर ६० वर्षांनी विजेची जोडणी

सौरऊर्जेद्वारे (फोटोव्होल्टीक) केली विजेची व्यवस्था !

कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता अटकेत !

अशा लाचखोरांवर कडक कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यासच इतरांवर जरब बसेल.  – संपादक

मुंबईतील प्रत्‍येक पोलीस ठाण्‍यात निर्भया पथक स्‍थापन करण्‍याचे आदेश

सर्व पोलीस ठाण्‍यांमध्‍ये ‘महिला सुरक्षा कक्ष’ स्‍थापन करण्‍यात येणार असून याला ‘निर्भया पथक’ असे नाव देण्‍यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्‍त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र येथे मुसळधार पाऊस पडणार !

मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, पालघर, रायगड आणि रत्नागिरी आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मध्यप्रदेशातील शंकरपूर येथील सरकारीकरण केलेल्या मंदिराची भूमीची अवैध विक्री !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! केवळ मध्यप्रदेशच नव्हे, तर भारतात ठिकठिकाणी मंदिरांची भूमी अशा प्रकारे लाटण्यात येत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी मंदिरांचे सरकारीकरण रोखणे आवश्यक !

१५ सप्टेंबरपर्यंत लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण न दिल्यास आंदोलन करू ! – पंचमसाली पिठाचे स्वामी बसव जय मृत्युंजय यांची चेतावणी

स्वातंत्र्यानंतर केवळ १० वर्षे आरक्षण देण्यात यावे, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. हे सूत्र सर्वांनीच लक्षात घेणे आवश्यक !

कोरोना उपचारासाठी ‘अणु तेल’ हे आयुर्वेदाचे औषध प्रभावी ! – नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड

हिंदूंना ‘गोमूत्र पिणारे’ आणि ‘रानटी संस्कृतीचे लोक’ म्हणून हिणवणारी अन् हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी सरसावलेली विद्वान मंडळी आता चकार शब्दही काढणार नाहीत, हे लक्षात घ्या !

महोबा (उत्तरप्रदेश) जिल्ह्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ आहे. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय स्तरावर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे.

इस्लामिक स्टेटचे १० सहस्र आतंकवादी ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांमध्ये घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत !

तालिबानचे राज्य असणार्‍या अफगाणिस्तानमध्ये आता जिहादी आतंकवाद्यांना मोकळे रान मिळाले आहे. अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांच्या सीमेवर इस्लामिक स्टेटचे आतंकवादी आहेत.

धार (मध्यप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्या पुजार्‍याचा अज्ञातांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू  

भाजप शासित राज्यांत अशा प्रकारे पुजार्‍यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही !