गेल्या ७ वर्षांत सैन्यातील ८०० सैनिकांची आत्महत्या !

  • मानसिकदृष्ट्या सक्षम नसणारे सैनिक जनतेचे रक्षण तरी कसे करू शकणार ? सैनिक साधना करत नसल्याने ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्थिर कसे रहायचे’, हे त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे ते अशा प्रकारचे पाऊल उचलतात !
  • आधुनिक शिक्षणात आत्महत्या रोखण्याची कोणताही ठोस उपाययोजना नाही, हे त्याचे मोठे अपयश आहे. हे लक्षात घेता भारतियांकडून साधना करवून घेण्याची नितांत आवश्यकता आहे !
संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक

नवी देहली – मागील ७ वर्षांत सैन्यदल, नौदल आणि वायूदल यांतील ८०० सैनिकांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्‍नाला उत्तर देतांना दिली.

वर्ष २०१४ नंतर सैन्यदलातील ५९१ सैनिकांनी, वायूदलातील १६० सैनिक आणि नौदलातील ३६ सैनिक यांनी आत्महत्या केली, अशी माहिती नाईक यांनी दिली.