म्हादई पाणीवाटप तंटा
पणजी, २३ मार्च (वार्ता.) – म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्याच्या आरोपावरून गोवा शासनाने सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक शासनाच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या एका पथकाने नुकतीच पाणी वळवल्याच्या ठिकाणी कणकुंबी (कर्नाटक) येथे भेट दिली होती.
Mahadayi: Goa files contempt plea in SC against Karnataka https://t.co/5kC8PBX9Cu #news #headlines pic.twitter.com/RhAQVu9a3D
— News Karnataka (@Newskarnataka) October 6, 2020
याविषयी माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘कणकुंबी येथे केलेल्या पहाणीच्या निष्कर्षाविषयी तिन्ही राज्यांच्या अधीक्षक अभियंत्यांमध्ये एकमत झालेले नाही. पहाणीच्या निष्कर्षावर पहाणी करण्यासाठी गेलेल्या पथकाला एक अहवाल सिद्ध करून तो सर्वोच्च न्यायालयाला द्यायचा आहे. हा अहवाल सिद्ध करण्यासाठी तिन्ही राज्यांचे अधीक्षक अभियंते पुन्हा एक बैठक घेणार आहेत.’’