|
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील थणिसंद्रा या भागात १६ मशिदींकडून ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या कारणावरून जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यशासन आणि कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळ (के.एस्.पी.सी.बी.) यांना नोटीस बजावली आहे.
HC issues notice to BLRU Police Commissioner in connection with the loudspeakers at Thanisandra mosques
ಥಣಿಸಂದ್ರದ 16 ಮಸೀದಿಗಳಿಂದ ಶಬ್ದ ಮಾಲಿನ್ಯ ಆರೋಪ:ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಹೈಕೋರ್ಟ್ ನೋಟಿಸ್ https://t.co/xgekSJbU3J
No spine to act against this nuisance, but overnight they demolish temples
— भारत पुनरुत्थान Bharata Punarutthana (@punarutthana) March 10, 2021
या मशिदींवरून संध्याकाळी ध्वनीवर्धक लावून अजान ऐकवण्यात येते. ध्वनीवर्धकातून नेमून दिलेल्या डेसिबलपेक्षा अधिक ध्वनी प्रक्षेपित होतो. त्यामुळे मशिदीच्या परिसरात ध्वनीप्रदूषण होऊन स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.