आपल्याला काही होणार नाही, या भ्रमात राहू नका ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

अतीप्रगत देशांत कोरोनामुळे सहस्रावधी बळी जात आहेत. त्यामुळे ‘आपल्याला काही होणार नाही’, या भ्रमात राहू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे.

अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करणार्‍यास अटक

येथे एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.

‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या

देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला.

बिहारमधून पळालेल्या बंदीवानास ठाणे येथे अटक

बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या तिहेरी हत्याकांडातील बंदीवान प्रजितकुमार सिंह याला येथून अटक केली आहे. ४ वर्षांपूर्वीही त्याने बिहारच्या बक्सर कारागृहातून पलायन केले होते.

मुंबई ते झारखंड विनाअनुमती प्रवास करणारे १५ प्रवासी कह्यात

दळणवळण बंदी लागू करून ४-५ दिवस उलटले, तरी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन चालूच असणे, हे गंभीर आहे. पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई करायला हवी !

बिहार शासन प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार

कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्‍यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार शासन प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे.

(म्हणे) ‘इस्टरचे जेवण मद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही !’ – आयरिश रॉड्रीग्स

सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी इस्टरसाठी ११ एप्रिल या दिवशी लोकांना त्यांच्या आवडीचे मद्य विकत घेता यावे, यासाठी काही कालावधीसाठी मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना ३ मासांची मुदतवाढ

राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याच्या राज्यशासनाच्या प्रस्तावाला केंद्रशासनाने संमती दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १८१

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८१ पर्यंत पोचली आहे. मुंबईमध्ये नवीन ७ रुग्ण आढळले आहेत, तर नागपूर येथे १ नवीन रुग्ण आढळला आहे.

कोरोनारूपी असुराचा समूळ नायनाट करण्यासाठी रत्नागिरीत कालभैरवाला गार्‍हाणे

कोरोना संकटातून संपूर्ण रत्नागिरीसह तमाम जनतेला मुक्त करावे. कोरोना विषाणूची बाधा कोणालाही होऊ नये आणि रत्नागिरीतल्या नागरिकांना कायद्याच्या शिस्तीचे पालन करण्याची सबुद्धी प्राप्त होवो.