पतीइतकेच गृहिणींचेही काम महत्त्वाचे असल्याने त्यांनाही वेतन मिळायला हवे ! –  सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – घरी काम करणार्‍या गृहिणींचे कामही हे त्यांच्या नोकरी करणार्‍या पतीच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांनाही वेतन मिळायला हवे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले. ‘गृहिणींचा वेतन किती असावे ?, हे कसे ठरवण्याच्या यासंदर्भात काही ठोस साचेबद्ध नियम करता येणार नसले, तरी त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळावा असा मुख्य हेतू यामागे हवा’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.


न्यायालयाने पुढे म्हटले की, घरी असणारी कामांची संख्या आणि व्याप्ती पहाता या कामासाठी घरातील व्यक्ती जेवढा वेळ देतात आणि कष्ट करतात ते खरोखरच आश्‍चर्यचकित करणारे आहे. सामान्यपणे ही कामे पुरुषांपेक्षा महिलाच करतांना दिसतात.