वणी पोलिसांकडून गोवंश तस्करी करणारी ५ वाहने जप्त आणि ८ जणांना अटक

२९ गोवंशियांची सुटका

वणी (यवतमाळ), ६ जानेवारी (वार्ता.) – वणीमार्गे तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी पुष्कळ प्रमाणात वाढलेली आहे. याविषयी गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाल्यावरून बायपास मार्गावर सापळा लावून ५ वाहनात कोंबून भरलेला २९ नग गोवंश सोडवला. यात ८ जणांना अटक करून ५ वाहनांसह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.