‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे प्रमुख सुरेश चव्हाणके यांचे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना निवेदन !
मुंबई – सध्या राज्यात अनुमाने ८० लाख ते १ कोटी घुसखोर बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. ते स्थानिक जनजीवनावरच परिणाम करत नाहीत, तर राज्याच्या लोकशाही प्रक्रियेलाही गंभीरपणे बाधा आणत आहेत. घुसखोरांवर तातडीने कडक कारवाई न केल्यास महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे घुसखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन ‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे प्रमुख, तसेच ‘सुदर्शन न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना दिले आहे.
चव्हाणके म्हणाले की…
१. घुसखोरांच्या सहभागामुळे बोगस मतदानाच्या घटना वाढत असून लोकशाही प्रक्रिया कमकुवत होत आहे.
२. घुसखोरांच्या मोठ्या संख्येमुळे राज्य आणि देश यांच्या अंतर्गत अन् बाह्य सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
३. घुसखोरांमुळे स्थानिक लोकसंख्येचे संतुलन बिघडत असून सांस्कृतिक-सामाजिक समस्या निर्माण होत आहेत.
“𝐓𝐚𝐤𝐞 𝐀𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐀𝐠𝐚𝐢𝐧𝐬𝐭 𝐈𝐥𝐥𝐞𝐠𝐚𝐥 𝐁𝐚𝐧𝐠𝐥𝐚𝐝𝐞𝐬𝐡𝐢-𝐑𝐨𝐡𝐢𝐧𝐠𝐲𝐚 𝐢𝐧𝐟𝐢𝐥𝐭𝐫𝐚𝐭𝐨𝐫𝐬” – @SureshChavhanke Chief of Civil Society of Maharashtra and CMD, @SudarshanNewsTV has petitioned the DGP of Maharashtra
𝐓𝐡𝐞 𝐂𝐨𝐧𝐜𝐞𝐫𝐧:
– Estimated 80… pic.twitter.com/QA5zsZMkhk— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 18, 2024
मतदान प्रक्रिया सुरक्षितरित्या पार पडण्यासाठी करावयाच्या उपाययोजना !
१. १९ नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र पोलीस आणि निवडणूक आयोग यांच्या माध्यमातून घुसखोरांना मतदान प्रक्रियेपासून दूर रहाण्याची चेतावणी देण्यात यावी. ते मतदान केंद्रांवर आढळून आल्यास त्यांना तात्काळ अटक केली जावी.
२. १९ नोव्हेंबरच्या सायंकाळी संभाव्य घुसखोरांच्या भागात पोलिसांनी धाडी घालून तपास मोहीम राबवावी.
३. अवैध रहिवाशांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
४. २० नोव्हेंबरला संवेदनशील विधानसभा मतदारसंघांत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा.
५. या सर्व कारवाईची माहिती प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करावी.
६. असे केल्याने घुसखोरांमध्ये भीती निर्माण होईल आणि ते निवडणूक प्रक्रिया ‘हायजॅक’ करण्याचा कट रचू शकणार नाहीत.
७. आम्ही महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सतर्क रहावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.