देहली विश्वविद्यालयाच्या हिंदु महाविद्यालयामध्ये घेतले आहे शिक्षण!
कोलंबो (श्रीलंका) – हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत. श्रीलंकेत २ महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्येही त्या पंतप्रधान होत्या. त्या श्रीलंकेच्या इतिहासातील तिसर्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी सिरिमाओ भंडारनायके (३ वेळा) आणि चंद्रिका कुमारतुंगा (१ वेळा) या महिला देशाच्या पंतप्रधान होत्या. वर्ष २०२० मध्ये हरिणी अमरसूर्या पहिल्यांदाच खासदार झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी अमरसूर्या श्रीलंका मुक्त विद्यापिठात प्राध्यापक होत्या. वर्ष २०१५ मध्ये त्या सरकारविरोधातील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्या वेळी राष्ट्रपती दिसानायके यांच्या संपर्कात आल्या आणि २०१९ मध्ये त्या जनता विमुक्ती पेरामुना या पक्षात सहभागी झाल्या. अमरसूर्या यांनी वर्ष १९९१ ते १९९४ या काळात देहली विश्वविद्यालयाच्या हिंदु महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले आहे.