पोलिसांचा लाठीमार, संघ मुख्यालय परिसरात तणाव !
नागपूर – काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ १७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी नागपूरमध्ये पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे २ ‘रोड शो’ आयोजित केले होते. त्यापैकी एक फेरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल ते बडकस भागापर्यंत होती. तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी कमळाचे झेंडे घेऊन फेरीत घुसण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता.
या वेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजपच्या समर्थकांना मी शुभेच्छा देते; पण जिंकणार तर महाविकास आघाडीच आहे. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्याने तणाव वाढला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करून गदारोळ करणार्यांना बाहेर काढले. प्रियांका यांचा हा पहिलाच दौरा होता.