हिंदु संघटनांच्या विरोधानंतर गुन्हा नोंद
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील मोदीनगरातील गोविंदपुरीमध्ये असणार्या शिवशक्ति धाम मंदिराच्या धर्मशाळेत एका मुसलमान जोडप्याला विवाह करतांना हिंदु संघटनांनी पकडले. यामुळे येथे गदारोळ झाला. हिंदु संघटनांनी येथे आंदोलन केले. या गोंधळात विवाहासाठी आलेले जोडपे गायब झाले. विवाहसाठी मंदिर समितीने ४ सहस्र २०० रुपयांची पावती फाडली होती. शबनम नावाच्या महिलेच्या नावावर ही पावती आहे. मंदिराकडून पावती घेणार्या आणि विवाहाला अनुमती देणार्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आंदोलकांची मागणी आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी चालू केली आहे.
#Ghaziabad के शिवशक्ति धाम मंदिर में एक Mu$l!m जोड़े का विवाह । #HinduYuvaVahini के विरोध के बाद मामला दर्ज
हिन्दुओं को धर्म पर गर्व एवं धार्मिक शिक्षा न होने के कारण ऐसी घटनाएं हो रही हैं !
पढ़े विस्तृत – https://t.co/1GZ9Nwyd2b #UttarPradesh #SaveHinduTemples
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 20, 2024
१. हिंदु युवा वाहिनीच्या नीरज शर्मा यांनी पोलिसात तक्रार केली आहे. केवळ थोड्याशा पैशांसाठी मंदिर समितीचे लोक धर्माशी खेळत आहेत, असे नीरज शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
२. या प्रकरणात पोलीस अधीक्षक ज्ञान प्रकाश यांनी सांगितले की, शिवशक्ति धाम मंदिर ट्रस्टने मनोज सक्सेना नावाच्या व्यक्तीला कंत्राट दिले आहे. तोच तिथे कार्यक्रम आयोजित करतो. मनोज सक्सेना याने मुसलमान कुटुंबाला लग्नासाठी मंदिर परिसरात धर्मशाळेची जागा दिली होती. या विवाहामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून कंत्राटदार मनोज सक्सेना याला कह्यात घेण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनाच धर्माचा अभिमान आणि धर्मशिक्षण नसल्याने अशा घटना घडत आहेत ! |