कोरोनाच्या विरोधातील लस घेणे ऐच्छिक ! – केंद्र सरकार

एखाद्याला पूर्वी कोरोनाची लागण झाली असेल किंवा नसेल, तरीही लसीची पूर्ण मात्रा घेणे आवश्यक आहे, तरच विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आवश्यक त्या अँटिबॉडीज निर्माण होतात.

गोव्याने मागील ६० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली ! – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

गोव्याने मागील ६० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि याचे श्रेय यापूर्वी गोव्यात शासन करणार्‍या सर्व सरकारांना जाते, असे प्रतिपादन करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोमंतकियांना गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

खासगी रुग्णालयांवर कोरोना उपचारांसाठीच्या शुल्कावर मर्यादा घालण्याची आवश्यकता ! – सर्वोच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारने स्वतःहून हे करणे जनतेला अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘राज्यातील गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा !’ – चर्च संस्था

कर्नाटक शासनाने गोहत्या बंदी विधेयक संमत केल्यामुळे गोव्यात गोमांसाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. याविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चर्चसंस्थेशी निगडित ‘सामाजिक न्याय आणि शांती मंडळ’ यांनी केली आहे.

कलबुर्गी (कर्नाटक) येथील प्रशासकीय अधिकारी यशवंतराव सूर्यवंशी यांचा ‘विश्‍व रत्न पुरस्कार’ देऊन गौरव

बसला एका मोठ्या अपघातातून वाचवणार्‍या श्री. यशवंतराव सूर्यवंशी यांना पेशवा विश्‍व माता फाऊंडेशनच्या वतीने नुकताच विश्‍व रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जिल्हा पंचायतीचा पराभव एक आव्हान म्हणून स्वीकारणार ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

जिल्हा पंचायतीत पक्षाचा झालेला पराभव आम्ही एक आव्हान मिळून स्वीकारत आहोत. गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न हाताळून आम्ही यापुढे गोमंतकियांना एक चांगले नेतृत्व देणार आहोत.

आयुष आणि होमियोपॅथी डॉक्टरांना कोरोनावरील औषध लिहून देण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

डॉक्टरांनी याची निश्‍चिती करून घ्यावी की, त्यांनी लिहून दिलेली औषधे ही शासकीय मान्यताप्राप्त गोळ्या किंवा काढेच आहेत अन् ते कोरोना आजारासाठी नेहमीच्या उपचारांसमवेतच देण्यात येणारी अतिरिक्त औषधे उपाय म्हणून दिली जात आहेत.

कुडाळ बाजारपेठेत गांजाविक्री होत असल्याचे उघड करणार्‍यांना धमक्या देणार्‍यांवर कारवाईची मागणी

कुडाळ – येथील बाजारपेठेत गांजासदृश वस्तू विकतांना दोघे आढळून आले होते. हे प्रकरण उघड करणार्‍या तरुणांना धमक्या दिल्या जात आहेत.