अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि अंबिका योग कुटीर यांच्याकडून विनामूल्य ‘ऑनलाईन’ योगप्रशिक्षण !

कोरोनाच्या काळात विनामूल्य योग प्रशिक्षण देणार्‍या संघटनांचा स्तुत्य उपक्रम

कराड (जिल्हा सातारा) येथील सासवे कुटुंबातील ३ सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

कराड तालुक्यातील सैदापूर येथील ‘मिलिटरी होस्टेल’जवळ सासवे कुटुंबीय वास्तव्यास आहे. याच कुटुंबातील ३ सख्ख्या बहिणींचा १८ डिसेंबरच्या पहाटे उलट्या आणि जुलाब होऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोनदिवसीय गोवा भेटीसाठी १९ डिसेंबर या दिवशी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.

कोरोनाच्या विरोधातील लस घेणे ऐच्छिक ! – केंद्र सरकार

एखाद्याला पूर्वी कोरोनाची लागण झाली असेल किंवा नसेल, तरीही लसीची पूर्ण मात्रा घेणे आवश्यक आहे, तरच विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आवश्यक त्या अँटिबॉडीज निर्माण होतात.

गोव्याने मागील ६० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली ! – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

गोव्याने मागील ६० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि याचे श्रेय यापूर्वी गोव्यात शासन करणार्‍या सर्व सरकारांना जाते, असे प्रतिपादन करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोमंतकियांना गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

खासगी रुग्णालयांवर कोरोना उपचारांसाठीच्या शुल्कावर मर्यादा घालण्याची आवश्यकता ! – सर्वोच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारने स्वतःहून हे करणे जनतेला अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘राज्यातील गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा !’ – चर्च संस्था

कर्नाटक शासनाने गोहत्या बंदी विधेयक संमत केल्यामुळे गोव्यात गोमांसाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. याविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चर्चसंस्थेशी निगडित ‘सामाजिक न्याय आणि शांती मंडळ’ यांनी केली आहे.

कलबुर्गी (कर्नाटक) येथील प्रशासकीय अधिकारी यशवंतराव सूर्यवंशी यांचा ‘विश्‍व रत्न पुरस्कार’ देऊन गौरव

बसला एका मोठ्या अपघातातून वाचवणार्‍या श्री. यशवंतराव सूर्यवंशी यांना पेशवा विश्‍व माता फाऊंडेशनच्या वतीने नुकताच विश्‍व रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.