सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शॉपी चालू असणार

ठाणे – पितांबरीने येथील गोखले रस्त्यावरील हेमेंद्र सोसायटीच्या ठिकाणी पितांबरी शॉपी चालू करण्यात आली आहे. पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्र प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ४ फेब्रुुवारी या दिवशी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री. निरंजन डावखरे यांच्या हस्ते या या शॉपीचं उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी श्री. रविंद्र प्रभुदेसाई यांच्यासमवेत पितांबरीचे उपाध्यक्ष श्री. परीक्षित प्रभुदेसाई, सीईओ श्री. माधव पुजारी आणि स्थानिक नगरसेवक श्री. सुनेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पितांबरीची सर्व उत्पादने या पितांबरी शॉपीमध्ये मिळतीलच; परंतु त्यासह पितांबरीची नवीन उत्पादनेही येथे ग्राहकांना सर्वप्रथम खरेदी करता येतील. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत म्हणजेच हॅपी अवर्समध्ये या पितांबरी शॉपीमधून खरेदी करणार्या ग्राहकांना वर्षभर सवलत उपलब्ध असेलच. तसेच या शुभारंभाच्या निमित्ताने पितांबरीच्या उत्पादनांवर ग्राहकांसाठी विशेष सवलत घोषित करण्यात आली आहे. तरी ग्राहकांनी पितांबरी शॉपीला त्वरित भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन पितांबरीच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !