कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात रुग्णाला दिले कालबाह्य सलाईन

रुग्णांच्या जिवाशी खेळणारे रुग्णालय प्रशासन !

हितेंद्र ठाकूर यांच्या ‘विवा’ समूहाची ३४ कोटींची मालमत्ता कह्यात

‘विवा’ समूहाची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे. वसई-विरार येथील जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर आणि त्यांचे भाऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांची ही मालमत्ता आहे. पी.एम्.सी. अधिकोषातील घोटाळ्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

नेवासे येथे अवैध वाळू वाहतूक प्रकरणी ४ वाहने जप्त

नेवासा येथील तुकाराम महाराज मंदिराजवळ २ लक्ष १० सहस्र रुपयांची अवैध वाळू वाहतूक करतांना एका वाहन पकडले असल्याची माहिती नेवासे पोलिसांनी दिली आहे. तसेच ५ फेब्रुवारी या दिवशी ३ ठिकाणी अशाच स्वरूपाच्या कारवाईत ३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

मनसैनिकांकडून पथकर नाक्यावरील कर्मचार्‍यास मारहाण !

वाशी पथकर नाक्यावर कामास असलेल्या उत्तर भारतीय तरुणास मराठी का येत नाही ? असा जाब विचारला जात असतांना पथकर नाक्यावरील उतेकर नावाच्या एका मराठी कर्मचार्‍याने मध्यस्थी करतांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरले. 

अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

वेब सिरीजच्या नावाखाली स्वतः प्रोडक्शन हाऊसद्वारे पॉर्नोग्राफिक व्हिडिओचे चित्रीकरण करून ते संकेतस्थळावर ठेवल्याच्या प्रकरणी अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठ हिला येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ फेब्रुवारी या दिवशी अटक केली होती.

मुंडे यांचा सत्कार करणार्‍यांवर तृप्ती देसाई यांची टीका

मुंडेचे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी तत्त्वांना तिलांजली दिली ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

अमित शहा यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या कुडाळ तालुक्यातील पडवे येथील लाईफटाईम मेडिकल कॉलेजचा (वैद्यकीय महाविद्यालयाचा) शुभारंभ करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड येथील शिक्षण समिती सभापतींसह नगरसेविकांचे ठिय्या आंदोलन

पालिका आयुक्त सुट्टीवर असल्याने शालेय वस्तू वाटपाला उशीर होत असल्याचा आरोप करत येथील शिक्षण समिती सभापती मनीषा पवार यांच्यासह नगरसेविकांनी ३ फेब्रुवारी या दिवशी स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर आंदोलन केले.

मंचावर राजकीय गर्दी नको, या महामंडळाच्या भूमिकेच्या विरोधात मी नाही ! – छगन भुजबळ

साहित्य संमेलनाला कोणाला बोलवायचे हा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा आहे. मंचावर होणार्‍या कार्यक्रमात ढवळाढवळ करणार नाही. मंचावर राजकीय गर्दी नको, या महामंडळाच्या भूमिकेच्या विरोधात मी नाही.

उत्तराखंडमध्ये जोशी मठाजवळ हिमकडा कोसळल्याने पूरसदृश्य स्थिती : १५० हून अधिक जण बेपत्ता

भारतात आपत्काळाला प्रारंभ झाला आहे आणि तो प्रतिदिन हळूहळू त्याचे रौद्र रूप दाखवत आहे. जोशी मठातील हिमकडा अचानक कोसळून पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे, हा याच आपत्काळातील एक प्रसंग आहे.