भारताकडून तिसर्यांदा चूक सुधारण्याची चेतावणी !
जागतिक आरोग्य संघटनेला शब्दांची भाषा समजत नसेल, तर भारताने तिला देण्यात येणारी वार्षिक देणगी बंद केली पाहिजे !
नवी देहली – जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा भारतीय मानचित्र (नकाशा) चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. भारताने तिसर्यांदा याविषयी या संघटनेला चेतावणी दिली आहे.
The @WHO map currently shows the union territories of #JammuAndKashmir and #Ladakh in a shade different to the rest of the country.@DrTedros @narendramodi @PMOIndia
READ THE FULL STORY HERE: https://t.co/uqLRPPtwvK
— Outlook Magazine (@Outlookindia) January 14, 2021
(सौजन्य : A.I.O.C)
भारताने संघटनेचे अध्यक्ष डॉ. ट्रेड्रॉस यांना पत्र लिहून चूक सुधारण्यास सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरील भारताच्या मानचित्रात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन भूभाग भारतापासून वेगळे दर्शवण्यात आले आहेत.