चिखली (जळगाव) येथील हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

चिखली परिसर सूर्यवंशी पाटील महिला मित्र मंडळाच्या वतीने २३ जानेवारीला आयोजित केलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या जळगाव जिल्हा समन्वयक सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.

धाडस असेल, तर प्रशासनाने मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या सणांना असे उपक्रम राबवून दाखवावेत ! – रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

धर्माचे काडीचेही ज्ञान नसलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ! हिंदु धर्मातील सण, व्रते आदींमागे धर्मशास्त्र आहे. असे असतांना त्याविषयी निधर्मी व्यवस्थेतील कुठलाही घटक विचारून घेत नाही आणि स्वतःच्या मनानुसार त्यात हस्तक्षेप करतो !

संक्रांतीला पहूर (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

येथे संक्रांतीला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. यामध्ये २ जण घायाळ झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

विश्‍वातील सर्वांत मोठे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महापर्व ! १ कोटी ४० लाख भाविकांनी केले स्नान

गळ्यात मांजा अडकून दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची शक्यता !

अंधेरी येथून दुचाकीने घरी जात असतांना विलेपार्ले येथील सेंट्रल ब्रीजवरून जातांना अचानक गळ्यात मांजा अडकल्याने झालेल्या अपघातात वडाळा परिसरात रहाणारे नीतेश पातरे (वय २९ वर्षे) यांचा मृत्यू झाला.

आनंदप्राप्तीसाठी साधना करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सध्या मनुष्य सुख मिळवण्यासाठी धडपडत आहे; मात्र भौतिकतावादी जगात सर्वोच्च आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी साधना करावी लागते. त्यामुळेच मनुष्याची आध्यात्मिक उन्नती होते आणि त्याला जीवनाचा सर्वोच्च आनंद मिळू शकतो……

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने लाखो भाविकांचे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमावर पहिले स्नान !

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने देवनदी गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र अशा त्रिवेणी संगमावर देशभरातील लाखो भाविकांनी स्नान करून पुण्य प्राप्त केले. पवित्र स्नान झाल्यावर भाविकांनी तेथेच पूजा मांडून गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांची फुले-उदबत्ती वाहून आरती केली.

मकरसंक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नका !

‘मकरसंक्रांतीच्या दिवशी रूढी-परंपरेनुसार लहान बालके आणि सुवासिनी काळी वस्त्रे परिधान करतात. धर्मातील काही विचारसरणींची त्यास मान्यताही आहे. असे असले, तरी हिंदु धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो, तसेच अध्यात्मशास्त्रानुसार काळा रंग वातावरणातील तमोगुणी ….


Multi Language |Offline reading | PDF