उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. श्रीहरि गोरवर हा या पिढीतील एक आहे !
‘चैत्र शुक्ल तृतीया (३१.३.२०२५) या दिवशी चि. श्रीहरि बसवराज गोरवर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. श्रीहरि बसवराज गोरवर याला पाचव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. वय १ ते २ वर्षे
अ. ‘श्रीहरिला सात्त्विक आहार आवडतो.
आ. श्रीहरि एक वर्षाचा असतांना तो ‘सनातन प्रभात’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ, यातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या छायाचित्रांकडे पाहून नमस्कार करत असे.
इ. तो ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील छायाचित्रे अनेक वेळा पहात असे.

१ ई. देवाची ओढ
१. श्रीहरिला रामायण आणि महाभारत यांतील गोष्टी ऐकायला आवडत असे. तो त्या गोष्टी लक्ष देऊन ऐकत असे.
२. घरातील एखादी व्यक्ती मंदिरात जायला निघाल्यास श्रीहरि लगेच ‘मीही येतो’, असे सांगून त्यांच्या समवेत जातो.
१ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : तो म्हणतो, ‘‘मी रामनाथी आश्रमात जाऊन गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन घेतो.’’ तो प्रतिदिन सकाळी उठल्यावर गुरुदेवांची पाद्यपूजा करण्याचा प्रयत्न करतो.
२. वय २ ते ४ वर्षे
२ अ. चांगली आकलनक्षमता : आम्ही श्रीहरिला एकदाच श्लोक म्हणून दाखवल्यासही त्याचा तो श्लोक मुखोद्गत होतो. तो अनेक श्लोक स्पष्ट उच्चारांसह म्हणतो.
२ आ. शिकण्याची वृत्ती
१. तो अनेक गोष्टींबद्दल जिज्ञासू वृत्तीने विचारतो. तो घरातील विद्युत् उपकरणे आणि यंत्रे यांच्याविषयी विचारून त्याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
२. तो आम्ही करत असलेल्या सेवा शिकण्याचा आणि आम्हाला साहाय्य करण्याचा प्रयत्न करतो.
२ इ. नामजपादी उपाय करण्याची आवड : आम्ही प्रतिदिन नामजपादी उपाय करतो. तो आमचे पाहून तसे करण्याचाप्रयत्न करतो.
२ ई. देवाप्रती असलेला भाव
१. तो लहान मुलांशी खेळतांना त्यांना सांगतो, ‘‘देव सर्वत्र आहे आणि तो सर्वकाही पहात असतो. त्यामुळेच भक्त प्रल्हादाला देवाने दर्शन दिले.’’
२. तो त्याच्या खेळण्यांना, उदा. चारचाकी गाडी, सायकल यांना देवतांच्या नामपट्ट्या लावतो.
– डॉ. (सौ.) स्फूर्ती बसवराज गोरवर (चि. श्रीहरिची आई), धारवाड, कर्नाटक. (१७.७.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJckमार्गिकेवरही पाहू शकता.