रामनाथी आश्रमाच्या परिसरातील सेतुरक्षक हनुमान मंदिरात नामजप करतांना साधकाला सुचलेले विचार

श्री हनुमान

१. सनातनचे साधक करत असलेली साधना ‘रामसेतू’प्रमाणेच असणे 

‘मी एके दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील ‘सेतुरक्षक हनुमान मंदिरा’पाशी नामजप करत बसलो होतो. तेव्हा माझ्या मनात पुढील विचार आले, ‘प्रभु श्रीरामाने वानरसेनेकडून रामसेतू बांधून घेऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती (साधना) करून घेतली. सनातनच्या आश्रमांमध्ये साधक विविध सेवा करतात. ती सेवा म्हणजे एकप्रकारे ‘रामसेतू’सारखीच आहे.

२. आश्रमातील सेवारूपी ‘रामसेतू’ साधकांना मोक्षापर्यंत नेणार असणे 

सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या साधकांना गुरुदेव पुष्कळ अनुभूती आणि आनंद देतात, तसेच ‘स्वभावदोष कसे नष्ट करावेत ?’, हे शिकवतात. रामसेतू बांधण्याच्या सेवेत सहभागी झालेल्या वानरांना मोक्षप्राप्ती झाली, तसेच सनातनच्या आश्रमातील सेवारूपी ‘रामसेतू’ सहभागी साधकांना मोक्षापर्यंत नेणारच आहे.’

– श्री. सूरज हरवाळकर (वय २८ वर्षे), रामनगर, ता. खानापूर, जि. बेळगाव. (२८.११.२०२४)