१. ‘हनुमंत श्रीरामाच्या चरणी बसला आहे, तशीच मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी बसले आहे’, असे मला जाणवत होते.
२. माझ्याकडून हनुमंताच्या चरणी ‘मलाही तुझ्यासारखी परात्पर गुरु डॉक्टरांची दास्यभक्ती करता येऊ दे’, अशी तळमळीने प्रार्थना होत होती.
३. ‘भक्तीसत्संग, म्हणजे भक्ती आणि आनंद यांचा सागरच आहे. त्यामध्ये केवळ डुंबत रहावे’, असे मला वाटत होते.

४. मी भक्तीसत्संग ऐकत असतांना माझ्या डोळ्यांतून पूर्णवेळ भावाश्रू येत होते.
५. एका प्रसंगानंतर माझी मारुतिरायाप्रती श्रद्धा न्यून झाली होती. भक्तीसत्संगाच्या माध्यमातून मारुतिरायाची थोरवी ऐकत असतांना मी मारुतिरायाशी एकरूप होऊन गेले.
‘माझ्या मनातील मारुतिरायांविषयीचा विकल्प गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने दूर झाला’, याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. पल्लवी म्हात्रे, रायगड (१४.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |