‘२९ मार्च २०२५ या दिवशीच्या गोचरामध्ये काळपुरुषाच्या कुंडलीच्या १२ व्या घरात मीन राशीमध्ये पिशाच योगासह षट्ग्रही योगही (रवि-शनि-चंद्र-बुध-शुक्र-राहू) निर्माण होत आहे. ४ किंवा त्याहून अधिक ग्रहांची युती बहुतांश अशुभ असते. गोचरच्या या स्थितीमुळे मे ते जून २०२५ पर्यंत खालील परिणाम होण्याची शक्यता आहे.

१. अशा परिस्थितीत अनेक वेळा काही गोष्टी व्यक्ती, राष्ट्र आणि जग यांच्या नियंत्रणाबाहेर होऊन जातात.
२. शनि-राहु पिशाच योगाच्या प्रभावामुळे आर्थिक व्यवहार मंदावू शकतात आणि भयंकर आर्थिक मंदी येऊ शकते.
३. लोकांच्या जीवनात निराशा, वैफल्य आणि आळस यांचा आवेग तीव्र होऊ शकतो.
४. मज्जासंस्थेवर अधिक दबाव निर्माण झाल्यामुळे मानसिक आजार वाढून मानसिक नैराश्यात वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयविकार आणि मेंदू यांचा झटका, तसेच आत्महत्या इत्यादींच्या प्रकरणांमध्ये अनपेक्षित वाढ होऊ शकते.
५. पती-पत्नी आणि जवळचे नातेसंबंध यांमध्ये फूट पडू शकते, तसेच कायदेशीर वाद उद्भवू शकतात.
६. जगात आणि जगातील अनेक राष्ट्रांमध्ये अस्थिरतेची शक्यता आहे. भारताच्या शेजारील देशांमध्ये युती आणि कठपुतली सरकारे कोसळू शकतात.
७. जगात दूरगामी परिणामांसह ऐतिहासिकदृष्ट्या अभूतपूर्व घटना घडू शकतात, ज्या इतिहासाचा मार्ग आणि दिशा निश्चित करतील.
वरील नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी व्यक्तीने महामृत्यूंजय मंत्र, शनि आणि राहू यांचा वैदिक मंत्र (‘ॐ शं शनैश्चराय नम: ।।’ आणि ‘ॐ रां राहवे नम:।।’) किंवा आपले ज्योतिषी / आचार्य / गुरु यांनी सांगितलेला मंत्र, साधनापद्धत आणि उपाय यांचा आश्रय घेतला पाहिजे. याकाळात बाहेरील नकारात्मक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून स्वतःला, तसेच आपल्या लोकांना शक्य तितके आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा.’
– आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा, पाटलीपुत्र, बिहार.
२५ डिसेंबर २०१९ या दिवशी धनु राशीत पंचग्रही योग बनला होता, तसेच २६ डिसेंबर या दिवशी व्यापक प्रभाव असणारे सूर्यग्रहणही लागले होते. त्यानंतर संपूर्ण जगभर ‘कोविड’ महामारी पसरली होती. फेब्रुवारी १९६२ मध्ये मकर राशीत अष्टग्रही योग आणि सप्टेंबर १९७९ मध्ये सिंह राशीमध्ये पंचग्रही योग बनला होता. इतिहास सांगतो की, याच्या जवळपासचा कालखंड मोठ्या प्रमाणात उलथापालथीचा होता.
– आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा