उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. श्रीराम मुरुकटे हा या पिढीतील एक आहे !
उद्या चैत्र कृष्ण प्रतिपदा (१३.४.२०२५) या दिवशी वरळी, मुंबई येथील येथील चि. श्रीराम मुरुकटे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईवडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. श्रीराम मुरुकटे याला सनातन परिवाराकडून द्वितीय वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
अ. ‘मला पोटातील बाळाच्या समवेत श्री दत्तगुरु आहेत आणि तेच त्याचा सांभाळ करणार आहेत’, असे सातत्याने वाटत होते. त्यामुळे मला ९ मासांच्या (महिन्यांच्या) कालावधीत सेवेसाठी घराबाहेर पडतांना कोणतीही भीती वाटली नाही.
आ. माझे उपाय नियमित होऊन आहार सात्त्विक झाला होता आणि मला दूरदर्शनवर सात्त्विक अन् धार्मिक मालिकाच पहायला आवडत होते.’
– सौ. अश्विनी अभिषेक मुरुकटे (वय ३४ वर्षे), वरळी, मुंबई. (१९.४.२०२४)

२. जन्मानंतर
अ. ‘प्रसूतीसाठी रुग्णालयात गेल्यावर सौ. अश्विनी पोटाजवळ श्री गुरूंचे रामरूपातील छायाचित्र असलेला दैनिक ‘सनातन प्रभातचा’ अंक घेऊन नामजप करत होती. त्यामुळे ती स्थिर होती.
आ. पत्नीला शस्त्रकर्मगृहात नेल्यावर माझ्याकडून कुलदेवतेला सतत प्रार्थना होत होती. ‘आई, या जिवाची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी त्याला आशीर्वाद दे. त्याला श्री गुरूंच्या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यास जोडून त्याची जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्ती होऊ दे.’ त्यानंतर लगेचच (१०.३४ वाजता) बाळाचा जन्म झाला. त्या दिवशी (सकाळी १०.३० पर्यंत) हनुमानजयंती होती.
३. जन्म ते ३ मास
अ. ‘श्रीरामचा जन्म झाल्यापासून ते आतापर्यंत (१७.४.२०२४) तो कधीही अनावश्यक रडला नाही किंवा त्याने हट्टीपणा केला नाही.
आ. तीन मासांचा असतांना बाळाला क्षयरोगची बाधा होऊन त्याचे शस्त्रकर्म झाले: पण या कालावधीमध्ये बाळ कधीही खूप रडले नाही किंवा त्याने अनावश्यक त्रासही दिला नाही.
इ. त्याला उचलून घेतल्यावर माझा नामजप आपोआप चालू होत असे.

४. ३ ते ५ मास
५ व्या मासापासून तो श्रीकृष्णाचे चित्र ओळखू लागला.
५. ७ वा मास : शरिरावर दैवी कण आणि ‘ॐ’ उमटलेला दिसणे
एकदा रात्री श्रीराम झोपलेला असतांना त्याच्या चेहर्यावर ४ – ५ चमकणारे दैवी कण दिसत होते. ते निरखून पहात असतांना त्याच्या डाव्या डोळ्याच्या पापणीवर चमकणार्या कणाच्या जवळ ‘ॐ’चा आकार उमटलेला दिसला, तसेच त्याच्या उजव्या तळहाताच्या मागील बाजूस ॐ उमटलेला दिसत होता.
६. ९ वा मास – भगवा ध्वज पाहिल्यावर श्रीरामने ‘जय ! जय !’, असे म्हणणे
२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. त्या दिवशी आम्ही घरी भगवा ध्वज लावला होता. ‘हा गुरुदेवांचा हिंदु राष्ट्राचा ध्वज आहे’, असे मी त्याला सांगितले. त्यानंतर त्याला कोठेही भगवा ध्वज दिसला की, तो ितकडे हात दाखवतो आणि ‘जय ! जय !’, असे म्हणतो. त्या वेळी त्याला पुष्कळ आनंद होतो.
७. ११ वा मास
७ अ. श्रीरामने बोलायला प्रारंभ केल्यावर प्रथम ‘दत्त’ हा शब्द उच्चारणे : श्रीरामच्या जन्मापासून आमच्या घरामध्ये भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप २४ घंटे चालू असतो. सामान्यतः लहान बाळ बोलायला लागते, तेव्हा प्रथम ‘बाबा’, ‘दादा’, ‘मामा’ असे शब्द बोलते. श्रीराम बोलायला लागला, तेव्हा त्याने प्रथम ‘दत्त’ हा शब्द उच्चारला. आम्ही ‘श्री गुरुदेव’ असे म्हणालो, की तो ‘दत्त’ असे म्हणत असे. कधी एकटा खेळत असतांना तो ‘दत्त-दत्त’ असा स्वतःहून नामजपही करतो. दत्ताच्या चित्राकडे पाहिल्यावर त्याला पुष्कळ आनंद होतो.
७ आ. ‘त्याला टिळा कसा लावायचा ?’ हे सांगितल्यानंतर तो कुंकवाच्या वाटीत बोट घालून स्वत:ला टिळा लावतो आणि दुसर्यांनाही लावण्याचा प्रयत्न करतो.
७ इ. रात्री देवाला नमस्कार करूनच झोपणे : श्रीराम रात्री झोपायच्या वेळी आम्ही त्याला विचारतो, ‘तू देवबाप्पाला सांगितलं का ?’ तेव्हा तो देवघराच्या दिशेने बोट दाखवतो आणि नमस्कार करतो. एक दिवस मी जरा लवकर अंथरुणावर पडलो होतो. तेव्हा तो माझ्याकडे आला आणि देवघराच्या दिशेने हात दाखवू लागला. त्याला उचलून देवघराकडे नेल्यावर त्याने देवाला नमस्कार केला आणि मगच तो झोपला.
७ ई. तो घरात श्रीकृष्णाचा पाळणा लावल्यावर आनंदाने नाचतो, तसेच ‘रामधून’ लावल्यावर तो सर्वांना टाळ्या वाजवायला सांगतो.
७ उ. देवाविषयी ओढ असणे
१. श्रीरामला देवाप्रती विशेष ओढ असल्याचे जाणवते. एखाद्या दुकानात गेलो असतांना तो तिथे देव्हारा दिसल्यावर ‘जय ! जय !’ करून तिकडे बोट दाखवतो.
२. या वर्षी गुढीपाडव्याला आम्ही श्रीरामला घेऊन गावी गेलो होतो. तिथे त्याला गावातील श्री दत्त मंदिरात घेऊन गेलो. तेव्हा त्याला पुष्कळ आनंद झाला. त्या दिवसापासून तो ‘मला मंदिरात घेऊन जा’, असे हाताने खुणावतो.
३. गुरुदेवांचे ‘हिंदु राष्ट्रा’च्या संदर्भातील ग्रंथ तो व्यवस्थित उघडून निरखून पहातो.
– श्री. अभिषेक वसंत मुरुकटे (चि. श्रीरामचे वडील), वरळी, मुंबई. (वय ३९ वर्षे) १९.४.२०२४
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.