सनातनच्‍या सात्त्विक मूर्ती सिद्ध करण्‍याच्‍या सेवेत योगदान द्या !

सनातन-निर्मित धुम्रवर्णाची सात्त्विक श्री गणेशमूर्ती

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘समाज सात्त्विक होण्‍यासाठी समाजातील प्रत्‍येक घटकाचे सात्त्विकीकरण होणे आवश्‍यक आहे’, अशी शिकवण दिली आहे. त्‍या अंतर्गत सनातन संस्‍थेच्‍या कला सेवेतील साधकांनी देवतांची सात्त्विक चित्रे, नामजप-पट्‍ट्या, रांगोळ्‍या यांच्‍या कलाकृती सिद्ध केल्‍या आहेत.  त्‍यांपैकीच एक असलेली श्री गणेशाची सात्त्विक मूर्तीही सनातनच्‍या साधकांनी सिद्ध केली आहे. अशा प्रकारच्‍या अन्‍य देवतांच्‍या मूर्ती सिद्ध करण्‍याची सेवा चालू आहे. अशा मूर्तींमुळे भावी काळात समाजाला सात्त्विकतेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. त्‍यासाठी जे साधकवृत्तीचे मूर्तीकार, मूर्ती रंगवू शकणारे कलाकार पूर्णवेळ आश्रमात राहून सेवा करू शकतात, अशांची आवश्‍यकता आहे. जे साधक, हितचिंतक, वाचक आदींना मूर्तीकलेविषयी ज्ञान आहे किंवा ज्‍यांची हे सर्व साधना म्‍हणून शिकण्‍याची अन् सेवा करण्‍याची इच्‍छा आहे, अशांनी त्‍यांची नावे जिल्‍हासेवकांच्‍या माध्‍यमातून कळवावी.

संपर्क 

श्री. अभिजित सावंत : ८७९३६७८१७८

ई-मेल : [email protected]