National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ६६१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करणार

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) काँग्रेसचे ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्र आणि ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावली आहे.

ईडीने नोव्हेंबर २०२३ मध्ये असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे ९० कोटी २० लाख रुपयांचे शेअर्स जप्त केले होते. या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी जामीनावर बाहेर आहेत. त्यांची यापूर्वी चौकशी झाली आहे.