उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. आभा ओंकार कर्वे ही या पिढीतील एक आहे !

चैत्र शुक्ल सप्तमी (४.४.२०२५) या दिवशी चि. आभा ओंकार कर्वे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. आभा ओंकार कर्वे हिला तृतीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. देवाची ओढ

अ. ‘चि. आभा रात्री रडायला लागल्यास मी तिला स्वामी समर्थांचा तारक मंत्र ऐकवत असे. तेव्हा ती लगेच शांत होते असे आणि झोपत असे.
आ. ती १ मासाची असतांना ती खोलीत लावलेल्या देवतांच्या नामपट्टयांच्या वास्तूछताकडे पाहून बोलत असे. ती दुर्गादेवीच्या नामपट्टीकडे बघून अधिक वेळ बोलत असे. तिला ‘दुर्गादेवी कुठे आहे ?’, असे विचारल्यावर ती लगेच त्या नामपट्टीकडे पाहून हसत असे.
इ. माझ्या आईच्या घरी श्रीकृष्णाचे मोठे चित्र आहे. ती त्या चित्राकडे बघून हसत असे आणि गप्पा मारत असे.
ई. एकदा सत्संगात ‘सत्गुरु मिले मोरे सारे दुख बिसरे ।’ हे भजन लावले होते. ते भजन ऐकत असतांना आभा खदखदून हसत होती. आम्ही भ्रमणभाषवर भजने लावल्यास ती शांतपणे ऐकत असे.
उ. आम्ही संध्याकाळी श्रीरामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र म्हणायला लागल्यावर ती चांगला प्रतिसाद देत असे. तेव्हा तिच्याकडे पाहून ‘आम्ही म्हणत असलेली स्तोत्रे तिला समजत आहेत’, असे आम्हाला वाटत असे.
२. तिच्या शरिरावर अनेक वेळा दैवी कण आढळतात.
३. आश्रमात गेल्यावर आनंद होणे
६.२.२०२२ या दिवशी आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा आभाला आश्रमात गेल्यावर पुष्कळ आनंद झाला. ती जोरजोरात टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत होती. तेव्हा तिला स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे जायचे होते.’
– सौ. गौरी ओंकार कर्वे (चि. आभाची आई), पुणे (३१.३.२०२४)
शांत आणि आनंदी चि. आभा कर्वे !![]() ‘सौ. गौरीने चि. आभावर चांगले संस्कार केले आहेत. ६ – ७ मासांपूर्वी सौ. गौरी आभाला घेऊन पुणे सेवाकेंद्रात आली होती. त्या वेळी आभा आईच्या समवेत पुष्कळ अंतरावरून दुचाकीवरून आली होती. आभा पुष्कळ प्रवास करून सेवाकेंद्रात आल्यानंतरही शांत आणि आनंदी दिसत होती.’ – पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत, वय ४३ वर्षे), पुणे (२४.९.२०२४) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.