टीका : ‘व्रत, वैकल्य कशाला ? त्याची आज विज्ञानयुगात काय आवश्यकता ? तो भोळसटपणा आहे, अंधश्रद्धा आहे.’

खंडण :
१. अंधश्रद्धेने पछाडलेल्या विज्ञानवाद्यांनी मनु, धर्म आणि व्रते यांना अंधश्रद्धा म्हणणे
‘आजचे युग विज्ञानाचे, म्हणजे अश्रद्धेचे. अश्रद्धा हीच श्रद्धा, निषेध हेच निमंत्रण, विध्वंस हेच सृजन ! मनु आणि धर्म यांना अंधश्रद्धा म्हणून मोकळे होणारे स्वतःच अंधश्रद्धेने पछाडलेले असतात.
२. प्रबळ इच्छाशक्ती आणि संकल्पशक्ती असणार्यालाच व्रताचरण करता येणे
व्रताचरण येड्या-गबाळ्याचे काम नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि संकल्पशक्ती असलेलाच व्रत पूर्ण करू शकतो. ‘कशा करता व्रत करायचे ? दिवसभर उपवास, चंद्र उगवेपर्यंत पाणीही का प्यायचे नाही ?’, तर संकल्पशक्ती बजावण्याकरताच नाना साधने, नाना उपासना आणि नाना व्रते आहेत. संकल्पशक्ती (Will Power) जागण्याकरता, सर्व काही उपासनादी खटाटोप !
३. भक्त होणे, हे जगातील श्रेष्ठतम ध्येय असणे !
परमार्थ काही दुबळ्याचे, येर्या-गबाळ्याचे काम नाही. दुबळा कधीच भक्त होऊ शकत नाही. भक्त होणे, संत होणे, हे जगातील श्रेष्ठतम ध्येय आहे !’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०१९)