व्यष्टी साधना भावपूर्ण रितीने करणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली बेंगळुरू येथील कु. मन्विता प्रकाश (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मन्विता प्रकाश ही या पिढीतील एक आहे !

८.४.२०२५ (चैत्र शुक्ल एकादशी) या दिवशी बेंगळुरू येथील कु. मन्विता प्रकाश हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

कु. मन्विता प्रकाश हिला आठव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. मन्विता प्रकाश

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. कु. मन्विताला लहानपणापासून भक्तीगीते आणि श्लोक म्हणणे अन् ऐकणे यांची आवड आहे. 

२. उत्तम स्मरणशक्ती 

तिची ग्रहण करण्याची क्षमता उत्तम आहे. तिने बालसंस्कारवर्गात शिकवलेले सर्व आत्मसात केले आहे.

३. धर्माचरण 

तिला सात्त्विक कपडे आणि बांगड्या घालण्यास आवडते. ती कपाळाला कुंकू लावते.

४. ती मला स्वयंपाक आणि अन्य कामांमध्ये साहाय्य करते. 

५. व्यष्टी साधना 

ती प्रतिदिन ‘दत्त’, ‘राम’ आणि ‘कृष्ण’ यांचा जप करते. ती ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप वहीत लिहिते. ती रात्री झोपतांना कृष्णाकडे क्षमायाचना करून आत्मनिवेदन करते.

– सौ. संजना प्रकाश, बेंगळुरू, कर्नाटक. (२४.५.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.