
वलसाड (गुजरात) – आमीष आणि भीती यांच्या आधारे धर्मपरिवर्तन व्हायला नको; कारण खरा धर्म हा सर्वांना सुख आणि शांती देतो. लोभ आणि भीती यांच्या प्रभावाखाली कोणत्याही परिस्थितीत धर्म पालटू नये, असे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
सरसंघचालक पुढे म्हणाले की, आम्हाला संघटित कसे व्हायचे हे ठाऊक आहे. आम्ही संघटित राहू इच्छितो. आम्हाला लढायचे नाही; पण आपल्याला स्वतःचे रक्षण करावे लागेल; कारण आजही अशा काही शक्ती आहेत, ज्या धर्मपरिवर्तन करू इच्छितात. जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात अशा शक्ती नसल्या, तरी लोभ आणि मोह यांच्यामुळे घटना घडतात.