‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे गत अनेक वर्षांपासून विविध विषयांवरील ग्रंथ, नियतकालिके, मासिके इत्यादींचे वाचन करतात. ते वाचन करतांना त्यातील उपयुक्त लिखाण खुणा करून देण्याची सेवा (लिखाण निवडण्याची सेवा) वयाच्या ८२ व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने करत आहेत. त्यांनी खुणा करून दिलेल्या लिखाणाचे टंकलेखन करून मग त्याचे संकलन करण्यात येते. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे लिखाण पडताळून अंतिम करतात. हे अंतिम केलेले लिखाण संकेतांक देऊन संगणकात संरक्षित करण्यात येते. यातील आवश्यक ते लिखाण त्या त्या विषयांशी संबंधित सनातन-निर्मित ग्रंथांमध्ये संदर्भासह समाविष्ट करण्यात येते.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी मासिके वाचून त्यांवर खुणा करून दिल्यानंतर त्या मासिकांतील स्पंदनांमध्ये काही पालट होतात का ?’, हे अभ्यासण्यात आले. यासाठी त्यांनी मासिके वाचण्यापूर्वी आणि ती वाचून त्यांवर खुणा करून दिल्यानंतर त्या मासिकांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. हे संशोधन पुढे दिले आहे.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी मासिके वाचून त्यांवर खुणा करून दिल्यानंतर त्या मासिकांत सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे किंवा त्यात वाढ होणे
या प्रयोगात ३ मासिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. या मासिकांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
वरील नोंदींतून लक्षात आलेली सूत्रे ‘१ अ.’पासून दिली आहेत.
१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी पहिले मासिक वाचून त्यावर खुणा केल्यानंतर त्या मासिकात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी हे मासिक वाचण्यापूर्वी त्यात सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा आढळून आली. त्यांनी ते मासिक वाचून त्यावर खुणा करून दिल्यानंतर मात्र त्या मासिकातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी दुसरे आणि तिसरे मासिक वाचून त्यांवर खुणा केल्यानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : या दोन्ही मासिकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ही मासिके वाचून त्यांवर खुणा करून दिल्यानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.
१ इ. मासिकांच्या मुखपृष्ठांतून सगुण, मलपृष्ठांतून सगुण-निर्गुण आणि मासिकांच्या आतील पृष्ठांतून निर्गुण-सगुण स्तरांवरील स्पंदने प्रक्षेपित होणे : मासिकांच्या मुखपृष्ठांपेक्षा त्यांच्या मलपृष्ठांतील सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अधिक आहे आणि मासिकांच्या आतील पृष्ठांतील सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण त्याहूनही अधिक आहे. याचे कारण हे की, मासिकांच्या मुखपृष्ठांतून सगुण, मलपृष्ठांतून सगुण-निर्गुण आणि ग्रंथांच्या आतील पृष्ठांतून निर्गुण-सगुण स्तरांवरील स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. सगुण, सगुण-निर्गुण आणि निर्गुण-सगुण स्तरांवरील स्पंदने अधिकाधिक सूक्ष्म असल्याने अधिकाधिक प्रभावी आहेत.
२. चाचण्यांतील नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. एखाद्या मासिकातून प्रक्षेपित होणारी स्पंदने विविध घटकांवर अवलंबून असणे : एखाद्या मासिकातून प्रक्षेपित होणारी स्पंदने विविध घटकांवर अवलंबून असतात, उदाहरणार्थ मासिकाचा उद्देश, त्यातील लेखांचे विषय आणि त्यांची मांडणी, मासिकाची भाषा अन् लिपी, लेखांचे व्याकरण आणि संकलन, लेखक अन् संपादक यांची आध्यात्मिक पातळी आणि त्यांना आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, तसेच मासिक-निर्मितीच्या संदर्भात विविध टप्प्यांवर केल्या जाणार्या कृती, उदाहरणार्थ मुद्रितशोधन, संरचना, मुखपृष्ठ अन् मलपृष्ठ यांची संकल्पना आणि त्यांवरील चित्रे अन् लिखाण इत्यादी. थोडक्यात हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील तेवढे त्या मासिकातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते.
चाचण्यांतील नोंदींतून आरंभी (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी मासिके वाचण्यापूर्वी) पहिल्या मासिकात नकारात्मक स्पंदने, तर दुसर्या आणि तिसर्या मासिकांत सकारात्मक स्पंदने असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी तीनही मासिके वाचून त्यांवर खुणा करून दिल्यानंतर त्या मासिकांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी तीनही मासिके वाचून त्यांवर खुणा करून दिल्यानंतर त्या मासिकांवर सकारात्मक परिणाम होण्याचे कारण : सर्वसाधारणत: मासिकांतील स्पंदनांचा परिणाम त्यांचे वाचन करणार्यांचे मन आणि बुद्धी यांवर होत असतो. येथे विशेष लक्षात घेण्याचे सूत्र, म्हणजे संतांमधील (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमधील) चैतन्याचा सकारात्मक परिणाम चाचण्यांतील मासिकांवर झाला आहे. याचे कारण हे की, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे अत्युच्च पातळीचे समष्टी संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. ते प्रत्येक मासिकाचे अभ्यासपूर्ण वाचन करतात. ते मासिकातील उपयुक्त लिखाण त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात खुणा करून देतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची चैतन्यमय दृष्टी, त्यांचे चैतन्यमय हस्ताक्षर आणि वाचन करतांना त्यांचा झालेला चैतन्यमय हस्तस्पर्श यांमुळे मासिके चैतन्याने भारित झाली.
थोडक्यात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी मासिके वाचून त्यांवर खुणा करून दिल्यानंतर त्या मासिकांतील स्पंदनांमध्ये सकारात्मक पालट होतात’, हे या संशोधनातून स्पष्ट झाले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.१.२०२५)
ई-मेल : mav.research2014@gmail.com