कुडाळ सेवाकेंद्रातून सेवेनिमित्त बाहेर जातांना वानराच्या रूपात मारुतिरायांचे झालेले दर्शन !

सद्गुरु स्वाती खाडये

‘३.११.२०२४ या भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मी अन्य साधकांसह कुडाळ सेवाकेंद्रातून एका जिज्ञासूला संपर्क करण्यासाठी जाणार होते. आमची चारचाकी गाडी सेवाकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ होती. आम्ही संपर्काला निघत होतो. तेवढ्यात एक वानर गाडीच्या छतावर येऊन बसले. आम्ही प्रयत्न करूनही वानर गाडीच्या छतावरून जात नव्हते. तेव्हा आम्ही ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप मोठ्याने केला. आम्ही वानराला खाऊ दिला; पण त्याने तो खाल्ला नाही. नंतर पुन्हा साधकांनी वानराला गाडीवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करूनही ते गेले नाही.

गाडीच्या छतावर येऊन बसलेले वानर

आम्ही याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी ‘‘तुम्हाला मारुतिरायाने दर्शन दिले’’, असे सांगितले.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेवांच्या) यांच्या कृपेने आम्हाला मारुतिरायांचे दर्शन होण्याचे भाग्य लाभले’, याबद्दल मी त्यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (१.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक