
‘शुचिता’ म्हणजे केवळ स्वच्छता नव्हे. संस्कृतमध्ये ‘शुचि’ हा शब्द प्रकाशवाचक आणि ज्ञानवाचक आहे. तो अत्यंत सूक्ष्म आहे. शुचितेचे योगसूत्र आहे. शुचितेने शरिराची आसक्ती जाते, आरोग्यप्राप्ती होते, ऐश्वर्यवृद्धी होते, वैराग्य लाभते आणि ईश्वराभिमुखता प्राप्त होते.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०२१)