आज (चैत्र पौर्णिमा) हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने…
१. हनुमानचालिसा पठणाच्यावेळी यवतमाळ येथील साधकांना जाणवलेलीसूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१ अ. सौ. मंदा पारखी (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ५५ वर्षे), वणी
१. ‘हनुमानचालिसा पठण करतांना थोडा वेळ माझे मन एकाग्र झाले आणि डोळे बंद झाले.
२. तेव्हा मला प्रकाश दिसला. त्यानंतर मला लाल, भगवा प्रकाश दिसला आणि ‘त्यामध्ये हनुमानाने उड्डाण केले’, असे दृश्य दिसले.
३. नंतर काही वेळाने मला गारवा जाणवला.’
१ आ. सौ. शांता घोंगडे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६५ वर्षे), यवतमाळ
१. ‘हनुमानचालिसा ऐकतांना थंडगार हवा येत आहे. चंदनाचा सुगंध सुटला आहे’, असे मला जाणवत होते.
२. मला मोठा झेंडा दिसला. मला सूक्ष्मातून दिसले, ‘सर्व साधक झेंडा घेऊन हनुमानाच्या जवळ गेले आहेत. तिथे श्रीरामाच्या चित्राजवळ हनुमंत हात जोडून बसला आहे.’ मला पुष्कळ आनंद झाला आणि माझ्या शरिरावर रोमांच आले. मला ‘झेंडा, म्हणजे आनंदाची गुढी आहे’, अशी अनुभूती येऊन माझा भाव जागृत झाला.’
१ इ. सौ. सुनंदा हरणे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ५४ वर्षे), यवतमाळ
१. ‘हनुमानचालिसा ऐकतांना मला प्रथम वर्धा येथील ‘सेवा’ या गावात असलेल्या हनुमानाच्या उंच मूर्तीचे दर्शन झाले. तेव्हा माझी भावजागृती झाली.
२. नंतर मी ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले आहे’, असा भाव ठेवला. मला सूक्ष्मातून दिसले, ‘हनुमान समोरच्या दिशेला फिरत आहे. नंतर हनुमानाने आश्रमावरून उड्डाण केले.’ ‘हनुमान आश्रम सुरक्षित करत आहे’, असे मला जाणवले.
३. त्यानंतर ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी हनुमान प्रदक्षिणा घालून ते ठिकाण सुरक्षित करत आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
४. नंतर मला सूक्ष्मातून दिसले, ‘भारताच्या चारही दिशांना हनुमंत फिरत आहे आणि सर्व दिशा सुरक्षित करत आहे.’
५. ‘हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी हनुमान साहाय्य करत आहे’, असा भाव माझ्या मनामध्ये जागृत होत होता.’
२. हनुमानचालिसा पठण करतांना कोल्हापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती
२ अ. सौ. साधना गोडसे, कोल्हापूर
१. ‘हनुमानचालिसा पठण करत असतांना मला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सगळीकडे हनुमानाची गदा फिरवत आहेत आणि सर्व अनिष्ट शक्ती नष्ट होऊन त्यांच्या चरणांजवळ येऊन पडत आहेत’, असे जाणवले.
२. ‘सर्व साधक हातात भगवा ध्वज घेऊन उभे आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.’
२ आ. सौ. रूपाली बराले, कोल्हापूर
१. ‘कोल्हापूर येथील सेवाकेंद्रात सामूहिक हनुमानचालिसा पठण करतांना माझे ध्यान लागले.
२. हनुमानाला ‘तुमच्यासारखी दास्यभक्ती माझ्यामध्ये निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यावर मला हलकेपणा जाणवला.’
२ इ. सौ. सुजाता वर्णेकर, गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर.
१. ‘हनुमानचालिसा पठणाच्या दिवशी सकाळपासून ‘हनुमान आपल्या घरी येणार आहे’, असा भाव ठेवून मी हनुमानाचा नामजप करत होते. हनुमानाची मानसपूजा करत असतांना मला आनंद होत होता.
२. हनुमानचालिसा पठण करतांना २ – ३ वेळा माझ्या शरिरावर रोमांच आले.’
२ ई. सौ. मेघमाला जोशी, कोल्हापूर
१. ‘हनुमानचालिसा पठण करत असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘हनुमंताची गदा सर्वत्र फिरत असून त्यातून पुष्कळ शस्त्रे निघत आहेत आणि सर्व साधकांचे त्रास दूर होत आहेत.’
२. ‘मारुतिराया सर्व साधकांचे रक्षण करत आहेत’, असे मला वाटले.
३. पठण करत असतांना मला पुष्कळ हलकेपणा जाणवला.’
२ उ. सौ. अनिता करमळकर, उंचगाव, कोल्हापूर
१. ‘सामूहिक हनुमानचालिसा पठण चालू असतांना साधकांना पुष्कळ आनंद मिळाला. काही साधकांचा भाव जागृत झाला आणि त्यांना प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली.
२. सर्व उपस्थित वाचक, साधक, युवा साधक यांना पाहून माझा भाव जागृत झाला. ‘गुरुदेव आपल्या सर्वांसाठी किती करतआहेत ! आणि गुरुतत्त्व किती मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे !’, ते मला अनुभवता आले.’
२ ऊ. सौ. माधुरी कुलकर्णी, कोल्हापूर
१. ‘कळंबा येथे नवीन धर्मशिक्षण वर्ग चालू झाला आहे. या वर्गाला येणार्या मुली आणि महिला सामूहिक हनुमानचालिसा पठणाच्या वेळी उपस्थित होत्या. पठण करतांना हनुमंताच्या चित्राला रुईची माळ घातली होती. त्या माळेच्या खाली एक पांढरे फूल वाहिले होते. पठण पूर्ण झाल्यावर सर्व जण कृतज्ञता व्यक्त करत असतांना ते फूल आपोआप उडून पडले. ते पाहून सर्व महिलांचा भाव जागृत झाला. त्यांना वाटले, ‘त्यांची सेवा हनुमंताच्या चरणी अर्पण झाली.’
२ ए. श्री. अनिकेत कदम, कोल्हापूर
१. ‘हनुमानचालिसा पठण करतांना प्रथम मला हनुमानाचे मारक रूप आणि नंतर तारक रूप अनुभवता आले. माझा भाव जागृत झाला.
२. मला पंचमुखी हनुमानाचे अस्तित्व जाणवले.’
२ ऐ. सौ. उमा ठोमके (वय ६३ वर्षे), कोल्हापूर
१. ‘हनुमानचालिसा पठण चालू असतांना माझे मन एकाग्र झाले होते.
२. मला सूक्ष्मातून दिसले, ‘साक्षात् मारुतिराया त्याच्या हृदयामध्ये भगवान श्रीराम आहे’, हे दाखवत आहे.’
३. त्या वेळी ‘माझ्या शरिरावरील अनिष्ट शक्तींचे आवरण निघून जात आहे’, असे मला वाटले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २.४.२०२५)
![]() १. ‘हनुमानचालिसाचे पठण करत असतांना ‘मी रामनाथी आश्रमात आहे’, असे मला वाटले. २. मला मनाची पूर्ण एकाग्रता साधता आली.’ – पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (सनातनच्या १०९ व्या संत, वय ८२ वर्षे), वारणानगर, कोल्हापूर. (२.४.२०२५) |
‘शनिगोचरा’च्या निमित्ताने सप्तर्षींनी दिलेला संदेश !
‘२९ मार्च २०२५ हा दिवस हिंदु राष्ट्र स्थापनेच्या इतिहासात एक महत्त्वाचा दिवस आहे. शनि ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर देश-विदेश, मानव-देवता, धर्म-अधर्म, राजकारण, अर्थव्यवस्था, पृथ्वी-आकाश अशा अनेक स्तरांवर कधी न घडलेले पालट होणार आहेत. या दिवशी अमावास्याही आहे. पृथ्वीवर काही ठिकाणी सूर्यग्रहणाचा प्रभाव असेल. थोडक्यात मानवी आयुष्यातील एक ‘आध्यात्मिक संधीकाल’ असे म्हणता येईल.
या संधीकालाला तोंड देण्यासाठी आणि संरक्षणासाठी सनातनच्या सर्वत्रच्या साधकांनी २९ मार्च या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत ७ वेळा हनुमानचालिसाचे सामूहिक पठण करावे. सर्व आश्रम, सेवाकेंद्र यांमध्येही सामूहिक पठण करावे. हनुमंत हा शनिपीडा दूर करणारा देव आहे.
– सप्तर्षी (नाडीपट्टीवाचन) (१८.३.२०२५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |