देवर्षि नारदांनी सांगितलेली भक्तीची लक्षणे

देवर्षि नारद

भक्तीच्या पुष्कळ व्याख्या आहेत; पण भक्तीची पुढील लक्षणे नारद सांगत आहेत. ‘जेव्हा सर्व विचार, शब्द आणि कृती ईश्वरार्पण होतात अन् ईश्वराची अल्पशी विस्मृतीही पुष्कळ दुःखदायक होते, तेव्हा भक्तीचा आरंभ होतो. जशी गोपींच्या ठायी होती तशी; कारण ईश्वरास आपला प्रियकर मानून त्याची भक्ती करत असतांनाही त्या त्याचे ईश्वरत्व कधीही विसरल्या नाहीत. अन्यथा व्यभिचारामुळे त्या पापी ठरल्या असत्या. भक्तीचा हा उच्चतम आदर्श होय; कारण यात परतफेडीची अपेक्षा मुळीच नाही. सर्व प्रकारच्या मानवी प्रेमात असली अपेक्षा आढळते.

– स्वामी विवेकानंद (साभार : ग्रंथ ‘धर्माचे स्वरूप आणि साधन’)