
किर्गिस्तान या मध्य आशियातील कडव्या सुन्नी बहुसंख्य असलेल्या इस्लामी देशातील महिलांना बुरखा आणि हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ‘बुरखा आणि हिजाब यांच्या आड आतंकवादी लपलेले असू शकतात’, असा किर्गिस्तान सरकारचा दावा आहे. ‘यामुळेच महिलांनी हिजाब घालून रस्त्यावर चालू नये’, असा निर्णय किर्गिस्तान सरकारने घेतला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडाचे प्रावधान केले आहे. ‘शरीयत कायद्यात डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकणे अनिवार्य नसल्याने याविरोधात फतवा काढला जाऊ शकत नाही’, असेही सरकारने म्हटले आहे आणि त्याच देशातील मुसलमानांच्या आध्यात्मिक प्रशासनाने सरकारच्या या प्रस्तावाला स्वीकृती दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, शरीयतचा हवाला, शिक्षेचे प्रावधान आणि तेथील मुसलमान नागरिकांकडूनही सरकारच्या या निर्णयावर कोणताही आक्षेप घेतला न जाणे, हे भारतात वक्फ सुधारणा कायद्यावरून आक्रंदन करणार्या मुसलमानांच्या राष्ट्रभावनेवर प्रश्नचिन्ह उभे करते. इतकेच नाही, तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (बानो) यांनीही राज्यात वक्फ सुधारणा कायदा लागू न करण्याविषयी घेतलेली भूमिका त्यांचे देशविघातक स्वरूप समोर आणणारे आहे. आतापर्यंत जगातील मुसलमानबहुल असलेल्या १८ देशांनी बुरख्यावर बंदी आणली आहे. मुसलमानबहुल देशांमधील बुरख्यावरील बंदी आणि हिंदूबहुल भारतातील मुसलमानांचा बुरख्याचा आग्रह ही २ टोके आहेत. बुरखा घालणे, सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण, तर ईदला प्राण्यांचा बळी देणे, या प्रकारांना सामान्य भारतीय नागरिक मुसलमानांच्या धार्मिक भावना समजत आला आणि ‘सर्वधर्मसमभाव’ जपण्यासाठी हिंदूबहुल भारतियांनी त्या जपल्या, त्याला खतपाणी घातले, त्यावर राजकारण केले, त्यावरच सत्ताही उपभोगली. आतापर्यंत मुसलमानांची धर्मांधता अनेक घटनांमध्ये दिसून आली, तरी भारतियांना त्यांचा निधर्मीपणा सोडू द्यायचा नाही, यासाठी अत्यंत मोठा खटाटोप देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहे. हे भारतियांना अवगत नाही, असे नाही; पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?
आजच्या काळातील अनेक थरारक चित्रपटांत बुरख्याआडून आतंकवादी कारवाया कशा करण्यात आल्या ? बुरख्याचा वापर करून गुन्हे कसे सर्रास केले जातात ? हे दाखवण्यात आले आहे; पण ती दृश्ये केवळ थरारपटांपुरतीच मर्यादित राहिली आहेत. किर्गिस्तानमध्ये सुरक्षेच्या कारणांमुळे आणि गुन्हेगारी वाढू नये, यांसाठी बुरखाबंदी केली जाते, त्याच्या अगदी उलट प्रक्रिया भारतात चालू आहे. भारतात धर्मांध मुसलमान शाळा-महाविद्यालयांतून मुसलमान मुलींना बुरखा घालू देण्यासाठी नको ते उपद्व्याप करत आहेत. याचाच अर्थ भारतातील मुसलमानांचे आतंकवाद्यांना वस्त्राआड लपवण्यासाठीचे प्रयत्न जोरकसपणे चालू आहेत, असे लक्षात येते.
भर उन्हाळ्यातच नव्हे, तर सगळ्या प्रकारच्या वातावरणात तंग आणि तोकडे कपडे घालणार्या हिंदु मुली अन् महिला मुंबईच्या चौपाटीवर मुसलमान मुलीच्या आग्रहावरून बुरख्यातील सौंदर्य अनुभवायला सिद्ध होतात; पण ‘योग्य कपडे परिधान करा’, या हिंदुत्वनिष्ठांच्या आवाहनाला स्त्रीस्वातंत्र्याचे दाखले देतात, हीच भारताची शोकांतिका आहे. पाश्चात्त्य असो वा इस्लामी आक्रमणे, त्यांना सहज स्वीकारले जाते; पण भारतीय परंपरेला बुरसटलेले ठरवले जाते. सामाजिक माध्यमांद्वारे काही टक्के भारतीय ‘हिंदु संस्कृती विज्ञानावर आधारित होती’, असे उघडपणे सांगू लागले असले, तरी ठामपणे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे पुरस्कर्ते अद्यापही मोजकेच ! त्यामुळेच ‘अमुक अमुक देशात बुरखा, हिजाब बंदी’ अशा बातम्या वाचून त्याकडे दुर्लक्ष न करता, हिंदुत्व जमत नसेल, तर किमान राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन तरी भारतियांनी बुरख्याला विरोध करायला हरकत नाही.
बुरख्याआड लपणार्या आतंकवाद्यांना समोर आणण्यासाठी भारतीय मुसलमानांना किर्गिस्तानचा आदर्श घेऊन राष्ट्रभावना सिद्ध करण्याची संधी ! |