तापाची लक्षणे आणि त्यावरील उपाय

१. तापाची लक्षणे

‘अंग गरम होणे, अंगदुखी, डोके दुखणे, थंडी वाजणे, घाम येणे, थकवा येणे आणि मळमळ होणे

२. उपाय

डॉ. दीपक जोशी

ज्या वेळी आपल्याला अकस्मात् ताप येतो आणि आधुनिक वैद्य भेटत नाहीत, अशा वेळी आपण पुढील उपाय करू शकतो.

अ. २ काळी मिरी आणि २ लवंगा ठेचून घेणे, अर्धा इंच ‘आले’ किसून घेणे, ४ – ५ तुळशीची पाने आणि सुपारीएवढे २ गुळाचे तुकडे घेणे अन् हे सर्व दोन कप पाण्यात घालावे. त्यानंतर हे सर्व एक कप होईपर्यंत उकळवावे आणि जो काढा होईल, तो गाळून प्यावा. काढा प्यायल्यावर साधारण २ घंटे पांघरूण घेऊन झोपावे. या वेळी पंखा लावू नये. २ घंट्यांनंतर काढ्यामुळे घाम येऊन ताप उतरतो आणि अंगदुखी न्यून होते. काढा दिवसातून ६ घंट्यांच्या अंतराने ३ वेळा घ्यावा. मग जसा ताप न्यून होईल, तसा २ वेळा, एक वेळा, असे करत आपण काढा घेणे बंद करू शकतो.

वरील उपाय वातामुळे जी अंगदुखी किंवा सांधेदुखी होते, त्यावरही आपण करू शकतो.

आ. जर शरिराचे तापमान १०० अंश फॅरनहाईटपेक्षा अधिक असेल, तर थंड पाणी आणि त्यात थोडे मीठ टाकून त्या पाण्यात कापड बुडवून हात-पाय थंड पाण्याने पुसावे अन् त्यासमवेत कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी.

वरील उपायाने ताप न्यून होईल, तरीही जेव्हा आधुनिक वैद्य उपलब्ध होतील, तेव्हा लगेच त्यांचा सल्ला घ्यावा.’

– दीपक जोशी, निसर्गाेपचार तज्ञ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स), देवद, पनवेल. (२४.८.२०२४)