ठाकरे गटाने संसदेत ‘वक्फ सुधारणा’ विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पक्षाचे त्यागपत्र ! – नितीन काळे

सांगली – संसदेत नुकतेच ‘वक्फ सुधारणा’ विधेयक मांडून ते संमत करण्यात आले. हे विधेयक मांडतांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षाची भूमिका ही लांगूलचालनाची दिसून आली. त्यामुळे संसदेत ‘वक्फ सुधारणा’ विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतल्याने मी उपशहरप्रमुख पदाचे त्यागपत्र देत आहे, असे श्री. नितीन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन वयाची २५ वर्षे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता शिवसेनेसाठी आणि हिंदुत्वासाठी काम करत आलो आहे.

‘वक्फ सुधारणा’ विधेयकाच्या सादरीकरणाच्या प्रसंगी जे लांगूलचालन करण्यात आले, त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला पुष्कळ वेदना झाल्या असतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार आणि भगवा ध्वज यांच्याशी तडतोड करत आहे. त्यामुळे मी पक्षाचे त्यागपत्र देत आहे.’’