विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस !

भास्कर जाधव

मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. उद्धव ठाकरे ४ मार्च या दिवशी विधीमंडळात आले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात पक्षाच्या चर्चेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे शिफारस पत्र दिले. विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केवळ १४ आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली असली, तरी अध्यक्षांच्या मान्यतेनेच विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ शकेल.