विधानसभेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !

भाजपचे आमदार राम कदम यांनी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडला. तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी विधानसभेच्या विशेषाधिकार भंग समितीकडे पाठवला आहे.

अयोध्या आणि श्रीनगर येथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारणार ! – अर्थमंत्री अजित पवार

राज्यातील भाविक आणि पर्यटक यांना अल्प दरात उत्तम अन् सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीरामजन्मभूमी अयोध्या, तसेच श्रीनगर येथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर शिवसैनिक मनोहर जोशी यांचे निधन !

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर, तसेच एकनिष्ठ शिवसैनिक मनोहर जोशी (वय ८६ वर्षे) यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने २३ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजता निधन झाले.

ठाकरे गटाचे राजन साळवी यांची उच्च न्यायालयात याचिका

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पत्नी आणि मुलगा यांच्यावरील गुन्हे रहित होण्यासाठी किंवा त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी ते उच्च न्यायालयात गेले आहेत.

Abhishek Ghosalkar Murder : मुंबई येथे शिवसेना (ठाकरे गट) नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या !

हत्या करणारा नोरोन्हा याने स्वतःलाही संपवले

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांचा अवमान सहन करणार नाही ! – रवीकिरण इंगवले, ठाकरे गट

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानाचा विपर्यास करत काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी ‘शंकराचार्य यांनी जाहीर क्षमा मागावी; अन्यथा पीठावर मोर्चा काढू’, अशी चेतावणी दिली आहे.

ठाकरे गटाची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने !

जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाच केला.

आडिवरे येथील तावडे भवन कोकणची शान ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजस्थानच्या राजपूत घराण्याचे तावडे हे वंशज आहेत. आडिवरे येथे ८०० वर्षांपूर्वी तावडे कुटुंबियांची वस्ती होती. आडिवर्‍याच्या महाकाली मंदिरातही त्यांचा मान आहे.

बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाहीत ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशातील आणखी एक मोठे न्यायालय आहे, ते जनतेचे न्यायालय आहे. आम्ही पाप केलेले नाही. विरोधकांना वाटले होते शिवसेना संपेल. आजची गर्दी याला उत्तर आहे.

कुणी गद्दारी करू नये, असा धडा शिकवा ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जात, पात, धर्म सगळे विसरून एकत्र येऊया आणि देशावरचे संकट दूर करूया. तरच आपल्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणण्याचा अधिकार राहील.